कुंभारे नगर, गोंदिया येथे…दद्दू उर्फ उज्वल निशांत मेश्राम याचे घडलेल्या खुन प्रकरणाचा अवघ्या काही तासात उलगडा करून खून करणाऱ्या आरोपीतास केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- स्थानिक गुन्हे शाखा आणि गोदिया शहर पोलीसांची संयुक्त कामगिरी…
▶️ याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक 18-06-2024 रोजी रात्री 21.30 वाजता ते 21.50 वाजताचे सुमारास मृतक नामे- दद्दू उर्फ उज्वल निशांत मेश्राम वय 17 वर्षे, रा. भीमनगर, मैत्रेय बुद्ध विहार चे मागे गोंदिया यास अंदाजे 20 ते 22 वर्षाचे अनोळखी इसमांनी संगनमत करून आंबेडकर भवन, कुंभारे नगर गोंदिया येथे अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने मृतकच्या शरीरावर वार करून गंभीर जखमा करुन जिवानिशी ठार केले आहे…..अश्या तक्रारदार बहीण फिर्यादी नामे…..सौ. मंजू निशांत मेश्राम वय 32 वर्ष रा. भीमनगर, मैत्रेय बुद्ध विहार चे मागे गोंदिया यांचे तक्रारीवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप 392/2024 कलम 302, 34 भादंवि अन्वये दिनांक 19-06-2024 रोजी 02.06 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला होता…
सदर खून प्रकरण गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी खून प्रकरणातील गुन्हेगारांचा कशोशिने शोध घेवून गुन्हेगारांना तत्काळ जेरबंद करून खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे निर्देश पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पो. नि. गोंदिया शहर यांना दिले होते..
⏩ मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे पथक आणि गोंदिया शहर चे पो.नि. श्री.चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक अशी विविध पथके सदर खून प्रकरणाचा उलगडा करण्याकरीता नेमण्यात आलेली होती…. गोपनीय माहितगार नेमण्यात आले होते……अज्ञात आरोपीतांचा शोध करीत असताना घटनास्थळा वरून प्राप्त माहीती, परिसरातील नागरिकांची विचारपूस व गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे…. खून करणारा गुन्हेगार आरोपी नामे –
1) अंकित घनश्याम गुर्वे वय 22 वर्ष रा. सिंगलटोली, आंबेडकर वॉर्ड, शिव मंदीर जवळ, गोंदिया यांस गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेवुन जेरबंद करण्यात आले आहे ..
नमूद आरोपीतांस गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन विचारपूस चौकशी केली असता तपासात यातील आरोपी यांनी त्याचा साथीदार फरार आरोपी नामे- 2) राहुल प्रशांत शेंडे 21 वर्ष रा. सिंगलटोली, आंबेडकर वॉर्ड, गोंदिया असे मिळून मृतक यास जुन्या भांडणाच्या कारणावरून वैमनस्यावरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने छातीवर वार करून गंभीर जखमी करून जिवे ठार केल्याचे निष्पन्न झाले आहे…..मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा सखोल तपास सपोनि. कदम पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत….
मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री. दिनेश लबडे, यांचे नेतृत्वातील पथक स.पो.नि. विजय शिंदे, पो.हवा. राजू मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, रियाज शेख, विनोद गौतम, घनश्याम कुंभलवार, लक्ष्मण बंजार तसेच पो. नि. श्री चंद्रकांत सूर्यवंशी, पो. ठाणे गोंदिया शहर, यांचे नेतृत्वातील पथक-* स.पो.नि. सोमनाथ कदम, पोउपनि थेर, पो.हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, निशिकांत लोदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, पोशि दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार, यांनी कामगिरी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com