गोंदिया जिल्हा पोलीस भरती करीता जिल्हा व जिल्हा बाहेरून येणाऱ्या उमेदवारांकरिता राहण्याची जागेची सोय माहिती बाबत..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– ⏩ गोंदिया जिल्हा पोलीस आस्थापनेवरील सन 2022-2023 मधील रिक्त 110 पदाची भरती प्रक्रिया दिनांक 19-06-2024 पासून सुरू झालेली आहे…. साधारण 15 दिवस पोलीस भरती प्रक्रिया राहणार आहे……पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील तसेच जिल्हा बाहेरील एकूण- 8026 उमेदवारांनी अर्ज सादर केले असून यापैकी 2372 महीला उमेदवार आहेत..
पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे “ब्रह्मपुत्रा” व “वैनगंगा” बिल्डिंगमधील “पोलीस क्वार्टर मध्ये” पोलीस भरती करिता बाहेरुन येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होवू नये म्हणून…. उमेदवारांना राहण्याकरीता व्यवस्था- जागेची सोय करण्यात आलेली आहे………पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या जिल्ह्यातील तसेच जिल्हा बाहेरील उमेदवारांनी कृपया याची नोंद घ्यावी .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com