अनधिकृत शस्त्र बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या…धुळे शहर पोलीस ठाणे शोध पथकाची विशेष कामगिरी …

प्रतिनिधी-रणजित मस्के
धुळे : शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी धुळे शहरातील सहजीवन नगर शासकीय दूध डेअरी येथे एका आरोपीला अटक केली .धुळे शहरात आगामी नवरात्र व इतर सण उत्सव लोकांना निर्भय पणे साजरे करता यावे याकरीता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील यांनी आदेशित केले होते.
पो.निरी.श्री. नितीन देशमुख यांना गोपनिय बातमीदारमार्फत बातमी मिळाली की,एक इसम सहजिवन नगर शायकीय दुध डेअरी रोड परिसरात काही तरी गंभीर अपराध करण्याचे इरादयाने त्याचे कब्जात गावठी कट्टा बाळगुन फिरत आहे.त्यावरुन पोलीस निरीक्षक देशमुख यांनी धुळे शहर पोलीस ठाण्याचे शोध पथकातील अंमलदारांना त्यांचे दालनात बोलवून बातमीची खात्री करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले.त्याप्रमाणे गुन्हे शोधपथकातील अंमलदारानी सहजिवन नगर, शासकीय दुध डेअरी परिसरात सापळा लावला असता त्यांना दिनांक-२३/०९/२०२२ रोजी ०८.०५ वाजता चे सुमारास अंगात मेंहदी खाकी रंगाचा सफारी शर्ट व मेंहदी खाकी रंगाची पॅन्ट परीधान केलेला इसम हा संशयास्पद फिरत असतांना मिळुन आल्याने पथकातील अमलदारानी त्यास ताब्यात घेवुन विचारपुस करता त्याने त्याचे नांव रविंद्र ऊर्फ राजु हनुमान वर्मा वय.५३ रा. सहजिवन नगर शायकीय दुध डेअरी रोड धुळे असे सांगितले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे कमरेला डाव्या बाजुस एक पिस्टल व पॅन्ट च्या उजव्या खिशात पाच जिवंत काडतुस असे एकुण २७५००/- रुपये किमतीचे अनधिकृत शस्त्र कब्जात बाळगातांना मिळुन आला.सदर बाबत धुळे शहर पोलीस ठाणे येथे गुरनं.554 /२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास असई/भिकाजी पाटील करीत आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील , मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव , मा. उप वि.पो.अधि.श्री. ईश्वर कातकडे , यांचे मार्गदर्शना खाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन देशमुख तसेच पोसई/बी.जी. शेवाळे, शोध पथकाचे पोलीस अंमलदार असई/भिकाजी पाटील, पोना/५८ कुदन पटाईत, पोकॉ/८१५ प्रविण पाटील, पोकॉ/१३०१ मनिष सोनगिरे, पोकॉ/१४२३ तुषार मोरे, पोकॉ/१४२४ अविनाश कराड, पोकॉ/१४१० गुणवंतराव पाटील,पोकॉ/१६७८शाकीर शेख यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com