अवैध धंदे करणारा जितेंद्र फरकुंडे १ महिन्याकरीता गोंदिया जिल्ह्यातून तडीपार…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

गोंदिया :– उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा- कु. पुजा गायकवाड, यांनी एका दारू विक्रेत्याला गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार केले आहे..

पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, श्री. साहील झरकर, यांचे निर्देश मार्गदर्शनात तिरोडा पोलिसांची कारवाई;-

⏩ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी आगामी काळातील सण उत्सव, बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते……

या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे प्राप्त निर्देश सूचना प्रमाणे पोलीस ठाणे तिरोडा परिसरातील हद्दीमध्ये वारंवार दारू विक्रीचे गुन्हे अवैध धंदे करणारा ईसंम नामे – जितेंद्र श्यामराव फरकुंडे राहनार निमगाव इंदौरा, ता. तिरोड़ा, जि. गोंदिया हा तिरोडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार दारू विक्रीचे गुन्हे करत होता. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्याच्या वागणुकीत व सवयीत काहीही परिणाम होत नव्हता.. त्याच्या अवैध धांद्याच्या कृतीमुळे जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. देवीदास कठाळे यांनी अवैध धंदा करणाऱ्या नमूद ईसमाला गोंदिया जिल्ह्यातून तडीपार करणे बाबतचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा कु. पुजा गायकवाड, यांना मंजूरी करिता सादर करण्यात आला होता. त्याचप्रमाणे मा. उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग तिरोडा यांनी नमूद जाब देणार यांना गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्याची शिफारस केलेली होती…

मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांनी नमूद जाब देणारा सराईत अवैध धंदे करणारा यास हद्दपार करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून गोंदिया जिल्ह्यातून 30 दिवसांपर्यंत (एक महिना कालावधी पर्यंत) गोंदिया जिल्ह्यातून तडीपार केले आहे….जाब देणारा याला तडीपारीची नोटीस तामील करून भंडारा जिल्ह्यात त्याच्या पसंतीच्या ठिकाणी नातेवाईकाच्या घरी राहणार असल्याचे कळविल्याने त्याला सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत स्टाफसह रवाना करण्यात आले आहे.

गोंदिया जिल्हा पोलीस व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा- कु.पुजा गायकवाड, यांनी केलेल्या हद्दपार कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून तिरोडा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे..

सदरची कारवाई मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा, श्री. साहील झरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यापुढेही पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात अवैध धंदे , कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे…

अवैध कृत्य करणा-या गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्यापासून तसेच अवैध धंदयापासून परावृत्त होवून ईतर वैध रोजगाराकडे वळण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे….

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट