सालेकसा पोलीसांनी कत्तलीकरीता २२ गोवंशीय जनावरांना निर्दयतेने कोंबून अवैधरीत्या तस्करीवर केले गुन्हे दाखल..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

गोंदिया :- 6 लक्ष, 03 हजार/- रुपयांचा मुददेमाल जप्त..

▶️ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना आगामी “बकरी ईद सणाच्या” पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैधरित्या चालणाऱ्या गोवंश तस्करीवर प्रतिबंध करण्याचे तसेच प्रभावी धाड कारवाई करण्याचे निर्देश सूचना दिलेल्या होत्या…

या अनुषंगाने मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव श्री. प्रमोद मडामे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. भुषण बुराडे पो. ठाणे सालेकसा यांचे नेतृत्वातील पोलीस पथक सालेकसा हद्दीत अवैधरीत्या चालणाऱ्या गोवंश तस्करीविरुध्द विशेष धाड मोहिम राबवित आहे….

या अनुषंगाने पो. नि. पो. ठाणे सालेकसा व पोलीस पथकाने मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 11- 06- 2024 रोजी चे रात्री 00.30 वा. ते 03.00 वाजता दरम्यान मौजा– पानगाव (साखरीटोला) जंगल परिसरात एका महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनात 8 नग गोवंश जातीची जनावरे, निर्दयतेने बंदिस्त मिळुन आले….तसेच मौजा- गल्लाटोला शेतशिवार परिसरातील झुडपी जंगलात. … अवैधरित्या तस्करी करीता निर्दयतेने बांधून ठेवलेले 14 नग गोवंश जनावरे मिळुन आली…किंमती एकूण- 6 लक्ष 3 हजार रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या कत्तली करीता गोवंशीय जनावरे वाहतूक प्रकरणी कारवाई करत जप्त करण्यात आलेला आहे….. मिळुन आलेली गोवंशीय जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारा- पाण्याची सोय, व्यवस्था व्हावी याकरीता गौशाळेत दाखल करण्यात आलेली असून त्यांची सुटका करण्यात आलेली आहे…

अवैधरित्या गोवंश जनावरांची तस्करी करणारे गुन्हेगार आरोपी नामे –
1) शाहबाज नुर हुसेन खान वय 52 वर्षे रा.टिमकीटोला (रीसेवाडा) तालुका-लांजी, जिल्हा– बालाघाट…

2) अंगरथ राजेंद्र मोहबे वय 29 वर्षे रा. चिचटोला (पिपरिया) तालुका– सालेकसा, जिल्हा- गोंदिया

यांचेविरूध्द पो. ठाणे सालेकसा येथे दोन वेगवेगळे अपराध अनुक्रमे – 172/2024 व अपराध क्र. 173/2024 कलम 5(अ) (2), 5 (ब), 6, 9 महाराष्ट्र प्राणी सरंक्षण कायदा, सहकलम 11(1) (क), 11(1) (ड)(ई)(फ)(ह) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतीबंध कायदा 1960 अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत…

मा. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव श्री. प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सालेकसा चे ठाणेदार पो. नि. भुषण बुराडे, स.पो.नि. अरविंद राऊत, पो.उप नि. अजय पाटील, पोशि राहुल रोकडे, जितेन्द्र पगरवार, विजेन्द्र चुलपार, चापोना राधेश्याम राहांगडाले, पो. स्टे. सालेकसा यांनी कार्यवाही पार पाडली…

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट