अपयशानंतर यशाचे पुढचे पाऊल..! घे भरारी करिअर मार्गदर्शक – श्री. अमोल भोजने

प्रतिनिधी- अनंत फिलसे
मुंबई :– अलीकडेच 10वि,12 वी चा निकाल लागला आहे, त्यात अनेक विद्यार्थी पास झाले आहेत पण जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांनी खचून न जाता, पदरात अपयश जरी आले,असले तरी त्यांनी यशा साठी पुढचं पाऊल टाकलंचं पाहिजे,ते पण जोमाने, जिद्देने आणि सातत्यपूर्व अभ्यासाने,
जसे गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला ते पचत नाही व त्यामुळे ते बाहेर पडते तसेच अपयशानंतर त्या अपयशाचा स्वतःवर गरजेपेक्षा जास्त नकारात्मक प्रभाव करून घेतल्यास त्यातून राग, चिडचिड, दुःख ,डिप्रेशन या गोष्टी बाहेर पडतात.
अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे माहीत असून देखील आपले मन त्या गोष्टीचा स्वीकार करायला मान्य नसते यशस्वी न झाल्यामुळे मला काहीतरी अजून नवीन शिकण्याची संधी मिळेल हा विचार आपण कधी करत नाही पहिल्याच प्रयत्नात यश मिळण्यापेक्षा एक-दोन प्रयत्न जर जास्त केले तर फायदाच होईल कारण पहिल्या वेळी केलेल्या प्रयत्न पेक्षा या दोन-तीन वेळी केलेल्या प्रयत्नामुळे माझ्याकडे दुपटीने ज्ञान असेल अशी जिज्ञासू भावना असावी व पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे आजची बरीच तरुण पिढी ही स्पर्धा परीक्षांकडे वळताना दिसते परंतु त्यांच्याकडे या क्षेत्रात येण्याचे काही मूळ ठोस कारण नसते फक्त लाल दिव्याची गाडी सरकारी बंगला समाजात भेटणारा मान या सर्व भौतिक गोष्टींचे आकर्षण तरुण पिढीलाला असते.व या गोष्टींचे भान नसल्यामुळे त्यांना अपयश येते व या गोष्टींचे भान नसल्यामुळे त्यांना अपयश येते.
समाजसेवा व समाजासाठी काम करण्याची इच्छा जर्मनी असेल तरच व्यक्तीने या क्षेत्रामध्ये यावे.
आपल्याला आवड असणाऱ्या क्षेत्रात जर काम करायला मिळाले तर आपले जीवन सुखकर होण्याच्या मार्गावर असते व आवड असणाऱ्या क्षेत्रासाठी धडपड करणाऱ्यांना जर अपयश आले देखील तरी ते यशाच्या मार्गासाठी नेहमी प्रयत्न करण्यास सक्षम असतात.
भौतिक गोष्टी नाकर्षित न होता त्या क्षेत्रातील अंतरिक गोष्टी ही समजून घ्यायला हव्या व मार्ग निवडावा.
अपयश म्हणजे काय ?ते आपल्याला दिसते का? या याच उत्तर आहे नाहीखरंतर अपयशी आपल्या डोक्यात असणारा एक वायरस म्हणावा लागेल जो दिवसान दिवस पसरत चालेला आहे दुसऱ्याला आलेले यश पाहून ते माझ्या वाटेला का नाही आणि दुसऱ्याला आलेले अपयश हे माझ्या वाटेला कधी येऊ नये या विचारसरणीमुळे आपण या छोट्या गोष्टीचा मोठा भाऊ करून बसतो.
खरंतर यश-अपयशाची व्याख्या ही ज्याने त्याने ज्याची त्याची ठरवायची असते..
“मिळाले तर BEST
नाहीतर NEXT”””
या प्रवृत्तीने जर प्रयत्न कराल तर वाटायला येणाऱ्या पैशाचा जास्त पाहू न करतापुढच्या तयारीचे नियोजन करण्यास सोपे पडते.
पहिला प्रयत्नात अपयश आल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी आपल्याकडे एक मजबूत हत्यार असते आणि ते म्हणजे अनुभव!!!
अनुभवाच्या जोरावर मागे झालेल्या चुका टाळून आपण आपल्याला आणखी योग्य कसे बनवते येईल त्याकडे लक्ष द्यावे.
अपयश ही एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते आणि एकदा हे करायला जमलं की मग सुका टाळत यशापर्यंत पोहोचणे सोपेच की!!!
आत्मपरीक्षण ही अशी गोष्ट आहे की ज्याने अनेक व्यक्ती घडवल्या.
आपल्याला आपल्या अंगी असणारे गुण आणि अवगुण समजायला हवे आणि ते समजणार अपयशातून…
अपयशानंतर स्वतःला दोष देण्यापेक्षा आणि स्वतःला खोलीत बंद करून घेण्यापेक्षा अपयशा मागचे कारण शोधा ,तुम्ही केलेल्या चुका शोधा आणि त्या चुकांमध्ये सुधारणा करून पुन्हा प्रयत्न करा..
अपयश आल्यानंतर लाज बाळगणे समाज काय म्हणेल या गोष्टींचा विचार करणे टाळा कारण प्रयत्न न करता अपयशी होण्यापेक्षा प्रयत्न करून अपयशी होणे कधीही चांगले आहे..
दुसरे काही नाही पण प्रयत्न केल्याचे तर समाधान मात्र आपल्याला नक्कीच मिळते..
अपयश आल्यावर थोडेफार तरी खचल्यासारखे वाटणारच याला अपवाद नाही परंतु यासाठी अनुभवी प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तींना भेटा त्यांच्याशी बोला व नव्याने तयारीला लागा..
कारण एका अपयासामुळे सुंदर आयुष्य गमावू नका आयुष्य हे शिकण्यासाठी तर मिळाले आहे..जो शिकतो तो चुकतो ,
या चुकांमधून शिकत जो पुढे जातो तोच आयुष्यात यशस्वी होतो..जसे अंधार नसता तर कदाचित प्रकाशाची किंमत आपल्याला कळाली नसती म्हणून हे लक्षात ठेवा की प्रत्येक अंधाऱ्या रात्री नंतर सोनेरी सकाळ ही उगवतच असते…पण विद्यार्थ्यांनी सकाळ होण्याची वाट पाहू नका, यशाचा मार्ग अंधारातूनच काढण्याचा प्रयत्न करा, माझे मार्गदर्शक अमोल पा. भोजने सर हे मला नेहमीच सांगत असतात कि स्पर्धा कोणतेही असो त्या स्पर्धेत टिकून राहणे खूप गरजेचे आहे तर आपल्याला यश मिळू शकतो, नापास होणे म्हणजे आपल आयुष्य नाही, केवळ परीक्षा आहे, म्हणून सांगते निराश होऊ नका, पुन्हा एखादा परीक्षेकरिता शुभेच्छा….! लेखिका /कवियत्री :- ऐस्वर्या राजेंद्र बोरकर ( UPSC स्टुडन्ट )
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com