रत्नागिरी जिल्हा स्तरीय भजन स्पर्धेत रायगड भुषण उत्कृष्ट पखावज विशारद श्री अजित वि. देशमुख यांची निवड..

0
Spread the love

उपसंपादक- राकेश देशमुख

रायगड:

श्री. अजित वि.देशमुख हे मु .पो. देशमुख कांबळे, ता महाड, जि रायगड येथील रहिवासी आहेत.

तसेच रायगड भूषण भजन सम्राट कै. विलास बुवा देशमुख गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ मौजे देशमुख कांबळे, तालुका. महाड, जिल्हा रायगड हे श्री अजित देशमुख यांचे चुलते होते. त्यांचे प्रेरणेने ते आज उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून प्रसिद्ध आहेत.

रत्नागिरी जिल्हा स्तरीय भजन स्पर्धेत लांजा उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा स्तरीय भजन स्पर्धेत वेळनेश्वर , गुहागर येथे देखील उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून निवड करण्यात आली आहे.

तसेच रत्नागिरी जिल्ह्यात भजन स्पर्धा मंडणगड दहागाव येथे देखील त्यांची उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून निवड करण्यात आली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट