शेअर मार्केटमध्ये ऑन लाईन गुंतवणुक करून फसवणुक केलेले 26,20,000/-रुपये पैकी 18,55,000/- रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात काशिगाव पोलीसांना मोठे यश !!

प्रतिनिधी – अक्षय कांबळे
काशीगाव :– मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील मीरा रोड पूर्व परीसरात राहणा-या श्रीमती संतोष कंवर यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवुन आर्थिक फसवणुक झाली होती. सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस ठाणे गु. रजि. क्रं. १६७/२०२४ भादवि कलम ४२०, ३४ सह माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमूद तक्रारी बाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळया बँकखात्यात वळती झाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बँकेसोबत पत्रव्यवहार करून संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर मा. न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी/अंमलदार यांनी वेळोवेळी पाठ पुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी 18,55,000/- रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे.
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…
- Telegram Channel, facebook, Instagram अथवा Watsapp वर जास्त परतावा देणा-या Promotional Adds वर विश्वास ठेवु नका. याद्वारे आपली आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता आहे. अश्या प्रकारच्या फसवणुकीमध्ये Telegram Channel, Watsapp Group वर अँड करुन तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे Sceenshot, Massages दाखवुन पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत केले जाते.
गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखवुन फसवणुक करण्यात येते.
एकदा गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणुकदारांना जास्त व खात्रिशिर परताव्याची हमी देतात. अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणुक होण्याचा धोका मोठया प्रमाणात असतो.
Share Market, Forex Trading, Crypto Investment, Mutual Funds मधील गुंतवणुक करण्याअगोदर आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करुनच गुंतवणुक करा.
कोणतेही अनाधिकृत अॅप्लीकेशन डाऊनलोड करु नये अथवा अनोळखी लिंक वर क्लिक करु नये.
ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे.
असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
सदरची कामगिरी श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परि-०१, मिरारोड, श्री. विजयकुमार मराठे, सहा. पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक श्री. राहुल सोनवणे, पोहवा / ०७१२८ सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.
सायबर फसवणुक हेल्प लाईन क्रमांक – १९३०
सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईट www.cybercrime.gov.in ही आहे
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com