खुनातील आरोपी याला १२ तासाचे आत संजयनगर पोलीस पोलीसांनी केले जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली :– गु.र.नं. कलम
१०६/२०२४

फिर्यादीचे नांव

हनंमत रामचंद्र शिंदे वय ४३ वर्षे व्यवसाय ३०२ प्लांचिग व्यवसाय, रा.शांतीनिकेतन शाळेजवळ बोळास प्लॉट सांगली ता. मिरज जि.सांगली

दि.११/०६/२०२४ १३.३१ वा.

रोजी पोना/२११२ सुरज सदामते यांना गोपनीय बातमीदारा मार्फत

दि.११/०६/२०२४ रोजी सकाळी ०८.३० वा.चे पुचीं राजीवनगर येथील इमाम हुसेन मस्जिदचे पाठीमागील बाजुस असले मंगळवार बाजारपेठ ते अभयनगर कडे जाणारे रोडचे पश्चिम काटास

-: कारवाई करणारे अधिकारी व अमंलदार :-

मा.पोलीस अधिक्षक श्री. संदीप पुगे सोो. मा. अप्पर पोलीस अधिक्षक रितु खोखर सोो.मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा सोो. उपविभाग मिरज (अतिरिक्त कार्यभार सांगली शहर) यांचे मार्गदर्शना खाली मा. पोलीस निरीक्षक श्री. बयाजीराव कुरळे सोो. यांचे आदेशान्वये पोना /२११२ सुरज सदामते, पोहेकों/७९ विनोद सांळुखे पोहेकों / १३३० नवनाथ देवकते, पोहेकों / अशोक लोहार, पोहेकों/७४७ दिपक गायकवाड, पोकॉ/१६५१ सुशांत लोंढे

अटक वेळ व दिनांक

आरोपीचे नांव

१) प्रतिक रामचंद्र शितोळे वय २३ रा. जुना कुपवाड रोड शामनगर पाण्याचे टाकीजवळ
कुपवाड

२) गणेश जोतीराम खोत वय ३० रा. माळी गल्ली नंबर ०१ माळी वस्ती संजयनगर सांगली

३) सिध्दनाथ राजाराम लवटे वय २५ सध्या रा. माळी गल्ली नंबर -०१ माळी वस्ती संजयनगर सांगली मुळ रा. एरळे ता. कवठेमहाकांळ जि. सांगली

आरोपीतकडून उघड झालेले गुन्हे तपास चालु आहे.

मिळाला माल :-

गुन्हयाची थोडक्यात हकीगत :-

वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांचा भाचा मयत नामे मयुरेश यशवंत चव्हाण वय ३० वर्षे मूळ रा. भेडवडे ता. हातकणगले जि. कोल्हापुर सध्या रा. शांतीनिकेतन शाळेजवळ बोव्ळास प्लॉट सांगली यास कोणी तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करुन खून केला आहे म्हणून वगैरे अशी फिर्यादी दिले वरुन
सदरचा गुन्हा संजयनगर पोलीस ठाणेत दाखल करण्यात आला होता.

वरील प्रमाणे गुन्हा दाखल होताच मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सोो व मा. अप्पर पोलीस अधिक्षक रितु खोखर सो यांचे मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री बयाजीराव कुरळे व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून घटनास्थळी तात्काळ भेट दिली आहे. सदर गुन्हयातील आरोपीत याचा शोध घेत असताना पोना /२११२ सदामते यांना त्याचे गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली कि,

काल दि.१०/०६/२०२४ रोजी रात्री मयत व तीन अनोळखी इसम यांचेमध्ये उत्तर शिवाजीनगर सांगली कुरणे चौकातील मुन्ना कुरणे यांचे देशी दारुचे दुकानाचे समोर किरकोळ भांडण झाले होते त्यावरुन त्या तीन अनोळखी इसमाचा शोध घेत असताना आरोपी क्र.१ ते ३ यांचीच मयत इसम याचे सोबत भांडण झाल्याचे माहिती मिळाली त्यानंतर तात्काळ तिन्ही आरोपीना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे सदर गुन्हया संदर्भात अधिक चौकशी केली असता त्यांनी मयत यास रागाने बघितले व शिवीगाळ केली या कारणावरुन घटनेचे ठिकाणी मयताचे डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून खून करुन पळून गेले आहेत. तरी सदर गुन्हयाचा अधिक तपास श्री. बयाजीराव कुरळे पोलीस निरीक्षक संजयनगर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट