ओतूर पोलीसानी खुनासहीत दरोडयाचा गुन्हा ४८ तासांत केला उघड..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :-ओतूर पोलीस स्टेशन गु.र.नं. २३८/२०२४ भा.दं.वि.का.क. ३०२ प्रमाणे दि. ०८/०६/२०२४ रोजी दाखल असून सदर गुन्हयातील मयत नामे नवाब अहमद शेख वय ७२ वर्षे सध्या रा. ओतूर ता. जुन्नर जि. पुणे हे एकटेच ओतूर येथील वडार वस्तीजवळील पानसरे यांचे पडोक बिल्डींगमध्ये राहत होते. मयत नवाब शेख हे ओतूर येथील कांदा मार्केट मध्ये मिळेल ते काम करत होते.

दि ०८/०६/२०२४ रोजी नवाव शेख हे ते राहत असलेल्या ठिकाणी मृत अवस्थेत मिळून आले. त्यांचे हनुवटीवर व गळयावर मारहाण झालेली होती, त्यांचा गळा दाबून खून करणेत आलेला होता, त्याबाबत फियांदो नामे शादाब नवाब शेख, वय ४२ वर्षे, रा. निमोण तास, ता. संगमनेर, जि अहिल्यानगर यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद नोंदविली आहे.

मृतक नवाब शेख यांना अज्ञात व्यक्तीने कोणत्या कारणासाठी मारले हे निष्पन्न करून जवळपासचे सर्व सीसीटीव्ही तपासण्याच्या सुचना मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण यांनी केल्या, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे तपास पथक व ओतूर पो स्टे चे तपास पथक अशी दोन पथके तयार करून घटनास्थळाकडे येणारे रोडवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. घटनास्थळाजवळ घटनेच्या अगोदर अनोळखी ०७ इसमांची संशयित हालचाल आढळून आली, त्याप्रमाणे सदर संशयित इसमांवर लक्ष केंद्रीत करून स्था.गु.शा. व ओतूर पो स्टे कडील पथकांनी गोपनीय बातमीदारामार्फत संशयितांची ओळख पटवून आरोपी नामे
१) विलास बाबा वाघ वय २० वर्षे, २) प्रकाश बावा वाघ वय १९ वर्षे,
३) भिमा गणेश हिलम वय २५ वर्षे, तिघेजण रा. कन्या शाळा जवळ, ओतूर ता. जुन्नर जि पुणे, यांचेसह इतर चार विधीसंघर्षात बालक ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्यांनी मृतक नवाब शेख यांचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले व त्यांचेकडे मयत व्यक्तीचे चोरी केलेले दोन मोबाईल मिळून आले आहेत.

त्या सर्वांनी कट रचून दरोडा टाकण्याचे उद्देशाने सदरचा गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयास भा.दं.वि.का.क. ३९६, १२० (ब) हे कलम वाढविणेत आलेले आहेत. आरोपी क्र १ ते ३ यांना मा. न्यायालयासमक्ष हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेवून तपास करणेत येत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, सो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री. रविंद्र चौधर, जुन्नर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ओतूर पो स्टे चे सपोनि लहू बाटे, पोसई अजित पाटील, स्वा.गु.शा.चे पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजू मोमीण, अतुल डेरे, संदिप वारे, अक्षय नवले, अक्षय सुपे, ओतूर पो स्टे कडील अंमलदार महेश पठारे, देविदास खेडकर, ज्योतीराम पवार, बाळशिराम भवारी, नदीम तडवी, यांनी केली असून पुढील तपास सपोनि लहू थाटे ओतूर पो स्टे हे करत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट