जुन्या मोटर बाईक व सेकंड हॅन्ड वाहन खरेदी करताना त्या चोरीच्या नसल्याचे खात्री करण्याचे गोंदिया पोलिसांकडून साधनेचा इशारा..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

गोंदिया :– ▶️ रोजच्या धकाधकीच्या जीवनात रोज सकाळी कामावर जातांना सुलभ लवकर कामावर पोहोचण्याकरिता कुठल्या ना कुठल्या वाहनाची गरज भासते…..बहुतेक नागरिक कामानिमित्ताने ग्रामीण भागातून शहराकडे आपले विविध कामासाठी सायकल, मोटार बाईक ने ये- जा करत असतात……

अश्यावेळी प्रत्येकालाच वाहनांचे वाढलेल्या महागाईमुळे म्हणा किंवा अर्थिक अडचणीमुळे नवीन महागडे वाहने खरेदी करणे शक्य होत नाही…आणि अश्यावेळी बरेचजण सेकंड हॅन्ड.. जुने वापरते वाहने खरेदी करतात… ..परंतू असे करत असताना अनेक लोक घेतलेल्या जुन्या वाहनाची….वाहनाचे मुळ मालकाची……तसेच ते वाहन खरेदी करताना चोरीचे आहे किंवा कसे? याबाबात संपुर्ण माहिती घेत नाहीत..व वाहन स्वस्त मिळाल्याच्या आनंदात वाहन खरेदी करून वापरतात…….परंतू असे करतांना पुढे भविष्यात आपल्याला….बरेचदा पोलीसांच्या कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागते…आणि अश्यावेळी आपला वेळ, पैसा अश्या वाहन खरेदीमुळे व्यर्थ वाया जाऊन आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जावू शकते…. .आणि या सर्व बाबी टाळण्यासाठी नागरिकांनी जुने सेकंड वाहन खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे..

◻️ गोंदिया जिल्हा पोलीस पथक ( ATB दहशतवाद विरोधी पथक) नी नागपूर वरून गोंदिया येथे विक्री करीता आणलेल्या 3 मोटार सायकल चोरीच्या असल्याबाबतचा चौकशीत उलगडा केला आहे…..

🔸याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावर ATB शाखा कार्यरत असून जिल्ह्यातील नागरीकांचे आंतरिक सुरक्षा संबंधाने कार्य करीत आहे….आणि या संबंधाने सदर ATB शाखेतील पोलीस अधिकारी – अंमलदार प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात कार्य करीत असताना दिनांक 27-5-2024 रोजी मौजा-कुडवा रोड गोंदिया येथील महाकाल ऑटो डिलर यांचेकडे खरेदी विक्री करीता असलेल्या मोटार बाईक गाड्या बाबत माहिती घेत असताना त्यांचेकडे विक्रीस उपलब्ध काही मोटार सायकल चोरीच्या असल्याचा संशय आल्याने पोलीस पथकाने मोटार बाईक गाड्याबाबत इत्यंभूत सविस्तर संपुर्ण माहिती घेतली असता…त्यांचेकडे विक्रीस असलेल्या 3 ॲक्टिवा मोटार बाईक गाड्यांचे कुठलेच कागदपत्रे नसल्याचे तसेच त्यांचे मुळ मालक नागपूर येथील रहिवासी असून त्या गाड्या नागपुर येथील….

1) पो.स्टे.इमामवाडा गुन्हा क्रमांक- 229/2024 कलम 379 भादवि

2) पो.स्टे.सक्करदरा गुन्हा क्रमांक 89/2024 कलम 379 भादवि आणि

3) पोस्टे पाचपावली गुन्हा क्रमांक 150/2024 कलम 379 भादवि

अन्वये दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे….सदर मोटार बाईक आरोपी नामे- मोहीत विनोद मेश्राम वय 25 वर्ष रा. बडवाईक बिल्डींग च्या मागे रामबाग, नागपुर यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून सदर आरोपी हा नागपूर येथे चोरीच्या गुन्ह्यांत अटक असल्याचे नागपुर पोलिसांनी सांगितले आहे…

सदरच्या तिन्ही चोरीच्या मोटार बाईक ॲक्टिवा गाड्या महाकाल ऑटो डिलर चे मालक यांचे ताब्यातून जप्त करून नागपूर पोलीसांना गुन्ह्यांचे अनुषंगाने स्वाधीन करण्यात आले आहे…..

सदर प्रकरणी महाकाल ऑटो डिलर चे मालक नामे- 1) लोकेश उर्फ पिंटू गोपाल रहांगडाले आणि 2) सुनील सुखचंद चौधरी राहणार गोंदिया यांचे विरूध्द नमूद चोरीच्या गाड्या चा खरेदी विक्रीचा अवैध व्यवसाय संबंधाने पुढील कायदेशीर कारवाई नागपूर पोलीस करीत आहेत…

▶️ याद्वारे गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यातील जनतेला, नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की, जुने सेकंड हॅन्ड वाहन खरेदी करताना…….सदर वाहनांचे प्रथम गाडी मालक (First owner), गाडी मालकाचे आधार कार्ड व मोबाईल नंबर गाडीचे खरेदी-विक्री पत्राबाबत संपुर्ण कागदपत्रे, खरीदी-विक्री पत्र आहेत किंवा कसे याबाबत संपुर्ण खात्री करूनच गाड्या खरेदी कराव्यात….. भविष्यात आपल्याला कुठल्याही कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घ्यावी….

मा. वरिष्ठांचे निर्देश सूचनाप्रमाणे सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. महेश विघ्ने, स्था.गु.शा. आणि दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस अंमलदार स.फौ. रमेश कुंभलकर, पो.हवा. ताज तिगाला यांनी केलेली आहे..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट