जनावरांना अमानुष वागणुक देवून अवैध कत्तल करण्याचे हेतुने बेकायदेशीररित्या डाबुन ठेवणारे ४ आरोपी जेरबंद २०३ जनावरे कवठेमहांकाळ पोलीसांच्या ताब्यात..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली :-फिर्यादी नाव
कवठेमहांकाळ पोलीस ठाणे

गु. र. नं. २६३/२०२४ भादविसं कलम ४२९,३४ सह प्राण्यांचा छळ प्रति. अधि. कलम ११(१) (ए) (एच) (आय) ५ (ब)९ व महा.पो.अधि. कलम ११९ प्रमाणे
सदाशिव आनंदा कणसे, पोहवा/४१०, नेमणुक कवठेमहांकाळ पोलीस ठाणे

गु. घ. ता. वेळ

गु. दा. ता वेळ दि. ०४/०६/२०२४ रोजी

माहिती कशी प्राप्त झाली गोपनिय बातमीदारामार्फत

दि. ०३/०६/२०२४ रोजी २०.३३ या चे सुमारास

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार ‘

उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभाग सुनिल साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था.गु.अ.शाखा, पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था.गु.अ.शाखा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उप निरीक्षक वैभय पाटील, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे, सहा
पोहेकॉ/४१३ पाटील, पोहेकों /१००६ खोत, पोना/२०४३ साबळे, पोशि/१४१९ करांडे, पोशि११३४ वसमळे, पोशि /व्हनमराठे, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे,
पोहेकों / अससिध्द खोत, अमोल पेंदाळे, संकेत मगदूम, पोना/संदीप नलावडे, स्था.गु.अ.शाखा,

अटक वेळ दिनांक दि. ०४/०६/२०२४ रोजी

आरोपी नांव पत्ता

१ ) बाजीराव ज्ञानू चंदनशिवे रा. आंबेडकर नगर, कवठेमहांकाळ,

२) आण्णाप्पा ऊर्फ सुखदेव चंदनशिवे रा. मेघराजा मंदिराजवळ, कवठेमहांकाळ,

३) संजय वाघमारे रा. आंबेडकर नगर, कवठेमहांकाळ,

४) हिमंत चंदनशिवे, रा. आंबडेकर नगर, कवठेमहांकाळ

जप्त मुद्देमाल ४,५०,०००/- रू. किंमतीची २०३ लहानमोठी गोवंशीय व म्हैस वर्गीय जनावरे

४,५०,०००/- (चार लाख पन्नास हजार रुपये)

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक, सांगली संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्यात कत्तलीला चंदी असलेल्या गोवंश व म्हैस जातीची जनावरे कवठेमहांकाळ शहरात व परिसरात असलेल्या ०४ वेगवेगळ्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबुन ठेवण्यात
आलेली असून सदरची जनावरे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात घेवून जाणार असलेबाबत खात्रीशिर बातमी मिळाली.

त्या अनुशंगाने दि. ०३/०६/२०२४ रोजी दोन पंचासह कवठेमहांकाळ पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथकामार्फत शिवाजीनगर, एमआयडीसी कवठेमहांकाळ, थबडेवाडी, आंबेडकरनगर- कवठेमहांकाळ अशा ०४ वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकला असता, सदर ठिकाणी
१) चाजीराव ज्ञानू चंदनशिवे रा. आंबेडकर नगर, कवठेमहांकाळ,
२) आण्णाप्पा ऊर्फ सुखदेव चंदनशिवे रा. मेघराजा मंदिराजवळ, कवठेमहांकाळ.
३) संजय वाघमारे रा. आंबेडकर नगर, कवठेमहांकाळ.
४) हिमंत चंदनशिवे, रा. आंबडेकर नगर, कवठेमहांकाळ यांचे मालकीचे पत्र्याचे शेडमध्ये नमुद आरोर्पीनी आर्थिक फायदयाकरीता एकूण २०३ गोवंशीय व म्हैस वर्गीय जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेपलेचे दिसुन आले.

लागलीच सदर चारही ठिकाणांचा सविस्तर पंचनामा पंचासमक्ष करण्यात आला असून सदर ठिकाणी मिळून आलेली एकूण २०३ गोवंशीय व म्हैस वर्गीय जनावरांना ताब्यात घेऊन सदर जनावरांना भगवान महावीर गोशाळा, कराड येथे संगोपनासाठी जमा केले आहे.

सदरबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात चारही आरोपींना अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपींना १ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि दत्तात्रय कोळेकर, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट