हातभट्टीवाला” काजु भदाडे व सावन देशपांडे यास एमपीडीए कायद्यान्वये भंडारा कारागृहात रवानगी…

उपसंपादक- रणजित मस्के
भंडारा :-काजु तुकाराम भदाडे वय 30 वर्ष रा. अरविंद वार्ड वरठी ता. जि.भंडारा (महाराष्ट्र) हा पोलीस स्टेशन वरठी परीसरातील वरठी येथील रहिवासी आहे. सावन सुनिल देशपांडे वय 30 वर्ष रा.चिखली हा पोलीस स्टेशन अड्याळ परीसरातील चिखली येथील रहिवासी आहेत त्यांनी आपल्या सोबत गुंड प्रवृतीच्या लोकांना सोबत घेऊन हातभट्टी मोहफुलाची दारु काटुन हातभट्टीवाला व्यक्ती अशी ओळख निर्माण केली.
काजु भदाडे हा मागील 5 वर्षापासुन व सावन देशपांडे हा 4 वर्षापासुन हातभट्टी दारु काढण्याचे व्यवसायात सक्रिय असुन त्याचेवर पोलीस स्टेशन, वरठी व अडवाळ येथे हातभट्टी दारु निर्माती, विक्री अशा प्रकारचे प्रत्येकी 4 गुन्हे दाखल असून काही गुन्ह्यात दारु निर्माण करुन मिळालेल्या पैशाचे बळावर निदर्दोष सुटका करीत आहे.
त्याने त्याची एमपीडीए कायद्यान्वये हातभट्टीवाला व्यक्ती अशी ओळख निर्माण केली होती. त्याचे कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत प्रभाव निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने अशा समाज विघातक व्यक्तीवर अंकुश बसविने गरजेचे होते.
अशा सराईत गुन्हेगारास कायद्याचे कसोटीत बसवून त्याचे गुन्हेगारीचा अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शानात काजु तुकाराम भदाडे वय 30 वर्ष रा. अरविंद वार्ड वरठी व सावन सुनिल देशपांडे वय 30 वर्ष रा.चिखली यांचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला.
त्यांना दिनांक 01/06/2024 रोजी जिल्हाधिकारी, भंडारा श्री. योगेश कुंभेजकर यांचे आदेशाने ताब्यात घेऊन जिल्हा कारागृह भंडारा येथे स्थानबद्ध करण्यात आले. यांनतर सुध्दा अशा धोकादायक व्यक्ती, रेती तस्कर, हातभट्टीवाले यांचे गुन्हे अभिलेख तपासुन एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनात नितीनकुमार चिंचोळकर पोलीस निरीक्षक (स्था.गु.शा.), श्री.अभीजीत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. वरठी श्री.धनंजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. अड्याळ, पो.हवा. राजेश पंचबुवे, पो.ना. अंकोश पुराम, पो.हवा सुभाष रंहागडाले, पो.शि. नितीन भालावरे, पोशि. प्रतीक उके यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com