जिल्हा परिषद पालघर इमारतीच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा…

प्रतिनिधी – मंगेश उईके
पालघर :– छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला.
कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला महाराजांचा हा इतिहासाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती व ग्राम पंचायती कार्यालयात शिवस्वराज्य दिन म्हणुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात देखील जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश निकम यांच्या हस्ते तसेच मा. सभापती. समाजकल्याण, श्रीम. मनिषाताई निमकर यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेच इमारतीच्या मध्येभागी भगव्या स्वराज्यध्वज शिवशक राजदंडास तसेच स्वराज्याची गुढी उभारुन व अभिवादन करुन साजरा करण्यात आला.
प्रसंगी मा अध्यक्ष यांनी सर्व पालघर वासीयांनी तसेच उपस्थितांना शिवस्वराज्य दिनाच्या सुभेच्छा दिल्या व आपल्या पुढच्या पिढीला स्वराज्य निर्मिती कशी झाली हे माहिती करुन देण्यासाठी आपल्या कुटुंबातील मुलांना व कुटुंबातील सदस्यांना गड किल्ले भटकंती करावयास सांगावी किंवा स्वत: कुटंबा समवत जावे तसेच आपल्या गड किल्ले स्वच्छ राहतील या कडे लक्ष देऊन कुठेही कचरा प्लास्टीक बाटल्या फेकु नये दिसल्यास कचरा कुंडीत टाकावे तसेच इतिहासाच्या उजळणीचे सुवर्णाक्षर प्रत्येकाच्या मनावर बींबवली गेली पाहीजे हीच महाराजांना खरी आदरांजली असेल अश्या भावना व्यक्त केल्या.




प्रसंगी मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सा. श्री. चंद्रशेखर जगताप, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास श्री. प्रविण भावसार, मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज पांडे, शिक्षणाधिकारी माध्य., संगिता भागवत सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com