महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याना मा. नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचे विशेष अभिवादन…

उपसंपादक – राकेश देशमुख
महाड :- आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने श्रीमान रायगड या स्वराज्याच्या राजधानीच्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना मा.नगराध्यक्षा स्नेहल (दिदी) माणिक जगताप
या प्रसंगी कोल्हापूर गादीचे युवराज छत्रपती संभाजीराजे त्यांच्या पूर्ण कुटूंबीयांच्या सहित उपस्थित होते.
त्याचप्रमाणे मराठा योद्धा श्री. मनोजदादा जरांगे पाटील हे सुद्धा उपस्थित होते.
स्व. माणिकराव जगताप व छत्रपती युवराज संभाजीराजे यांचे असलेले ऋणानुबंध जगजाहीर आहे.




यावेळी *स्व. माणिकराव जगताप साहेब यांनी आमदार असताना रायगडा वरील मेघडंबरी मध्ये छत्रपतींचा सिंहासनाधीष्ठित पुतळा बसवण्यात केलेले सहकार्य कायमच स्मरणात राहील अशी आठवण देखील छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी स्नेहल दिदी यांना सांगितली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com