प्राणांतिक अपघात घडला त्या ठिकाणी वाहतुक पोलिसांचे विशेष प्रबोधन…
उपसंपादक- राकेश देशमुख
माणगाव :– दिनांक 06/06/2024 रोजी 11.00 ते 11.30 वाजताच्या सुमारास म.पो.केंद्र महाड हद्दीत NH 66 वर माणगाव एसटी स्टँड समोरv झालेल्या प्राणांतिक अपघात ठिकाणी भेट दिली.

घटनास्थळी सुरक्षित ठिकाणी चालक व प्रवासी यांना थांबवून वाहतूक नियमन बाबत प्रबोधन केले. मा. अपर पोलीस महासंचालक ( वा ) म.रा. मुंबई, मा. पोलीस अधीक्षक सो,म. सु. प. रायगड विभाग,मा. पोलीस उपधीक्षक सो. म. सु. प. रायगड विभाग , मा. पोलीस निरीक्षक सो., म.सु. प. रत्नागिरी विभाग, यांचे मार्गदर्शना प्रमाणे खालील प्रमाणे संभाव्य अपघात टाळण्या साठी घ्यावयाचे दक्षते बाबत मार्गदर्शन करून प्रबोधन,जनजागृती करण्यात आली.
1) मो सायकल चालवताना नेहमी हेल्मेट चा वापर करावा.
2) वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा .
3) गाडीचे कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी.
4) वाहनांवर विशेषतः पाठी मागील बाजू रिफ्लेक्टर लावावे
5) दारू पिवून वाहन चालवू नये.
6) महामार्गावर धोकादायक परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवू नये.
7) नेहमी ओव्हरटेक करतांना उजव्या बाजूने करावे.
8) वाहन चालविताना वेग मर्यादाचे पालन करावे.
9) विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये.
10) वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे.
11) चारचाकी वाहन चालवताना चालक तसेच सर्वच प्रवाशांनी सीटबेल्ट वापरावे.
12) अल्पवयीन मुलांना वाहन चालविणेस देऊ नये.
13) दुचाकीवरून मालाची वाहतूक करू नये
14)वाहणाचे टायर,ब्रेक,साईड इंडिकेटर,आरसा,ई.स्पेअर पार्ट सुस्थितीत असलेची खात्री करावी
15)महामार्गवरून दुचाकी चालवताना शोल्डर लेनचा वापर करावा.
16)ट्रिपल सिट प्रवास करु नये.
*17)ज्या वाहनांवर प्रलंबित दंड आहेत त्यांनी म.पो.केंद्राशी संपर्क साधून तात्काळ दंड भरून घ्यावेत.
याबाबत मार्गदर्शन करुन मृत्युंजय दूत संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यात आली. अशी माहिती
श्री प्रवीण धडे पोलीस उपनिरीक यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com