कल्याण मध्ये गाडीच्या बोनेटवर आरामात झोपलेल्या तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

कल्याण :– कल्याण पश्चिमेत असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोरुन एक बीएमडब्लू कारच्या बोनेटवर एक तरुण आरामात पहुडलेला दिसला. या तरुणाला कारच्या बोनेटवर आरामात झोपलेले पाहताच रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचारी आणि अन्य वाहन चालकांना धक्का बसला.

या बीएमडब्ल्यू कारच्या बोनेटवर एक तरुण पाय पसरुन मस्तपैकी कारच्या राईडचा आनंद घेत होता. या घटनेचा व्हिडिओ काही लोकांनी बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.हा व्हिडिओ व्हायरल होताच बाजारपेठ पोलिसांनी कार मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव शुभम मितालिया आहे. मात्र तो बोनेटवर बसला आणि कारचे स्टीअरिंग त्याने अल्पवयीन मुलाच्या हाती दिले होते. कार चालविणारा मुलगा अल्पवयीन आहे. शुभम हा कल्याण पश्चिमेत राहतो. तर कार चालविणारा अल्पवयीन मुलगा कल्याण पूर्वेत राहतो. ही कार अल्पवयीन मुलाच्या वडीलांची असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली असून पुढील तपास सुरु आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट