कासा कोडापाडा येथे नाळ न कापलेले बेवारस नवजात मुल अर्भक सापडल्यामुळे विभागात खळबळ..

0
Spread the love

प्रतिनिधी – मंगेश उईके

पालघर-पालघर जिल्हा डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. २२ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान बेती कोडापाडा येथे नवजात अर्थक सापडून आले आहे.

सदर अर्भक बेती कोद्यापाडा येथील गवन शिवराम भोईर यांच्या घराच्या पाठीमागे लोखंडी कंपाउंड लगत बोरीच्या व आंब्याच्या झाडांच्या मध्ये जमिनीवर पडलेले सापडले. या पुरुष जातीच्या अर्भकाची नाळ कापलेली नसून अज्ञात महिला किवा पुरुषाने सदर अर्भकाला उघड्यावर खड्चात सोडून पलायन केल्याचा संशय व्यक्त करण्यता येत आहे.

सदर बेवारस अर्भक सापडल्यानी माहिती नंदिनी विजय कोदे यांनी कासा पोलीस ठाण्यात दिली.

माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बंडगर व त्यांचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून गुन्हा रजिस्टर नंबर १२० / २०२४ भादविस कलम ३१७ प्रमाणे दि. २३ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याच्या तपास संदीप नागरे पोलीस उपनिरीक्षक करीत आहे.

पीडित नवजात अर्भकावर औषध उपचार धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात सुरू आहे. सदर गुन्द्राव्या शीध येणे कामी नवजात बालकाचे डीएनए नाचणी करिता किटमध्ये सॅम्पल काढून सीलबंद करून मुंबई सांतक्रूझ कलिना येथे प्रयोग शाळेत पाठवण्यात आले असून आरोपीचा शोध लवकरात लवकर घेण्यात येईल, असे कासा पोलिसांनी सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट