बेकायदा पिस्टल कंबरेला लाऊन फिरणाऱ्या आरोपीचा पाठलाग करून ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

बार्शी :– ता. २१ : शहरातील लातूर रस्त्यावर असणाऱ्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाजवळ कमरेला बेकायदा, विनापरवाना पिस्टल लावून एक व्यक्ती फिरत असल्याची माहिती समजताच पोलिस पथकाने छापा टाकून त्यास पकडले. त्याच्याकडून गावठी पिस्टल, दोन राउंड व मोबाईल जप्त करून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक केली आहे.

आकाश सुभाष गाडे (हल्ली रा. माणकेश्वर, ता. भूम, जि. धाराशिव, इतर पत्ते : ब्रह्मा शेजारी गल्ली, रामनगर, सिंहगड रोड, पुणे, मूळगाव कापूरहोळ, ता. भोर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिस अंकुश जाधव यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान घडली.

पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती समजली, की एक संशयित कमरेला पिस्टल लावून लातूर रस्त्यावर फिरत होता. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे, हवालदार भांगे, अकुलवार, नितनात यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहिले असता ती व्यक्ती फिरत होती पण पोलिसांना पाहताच धूम ठोकली.

पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर त्यास पकडले. त्यावेळी त्याची झडती घेतली असता दहा हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल, दोन राउंड व मोबाईल फोन आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता, पिस्टल परवाना नसल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आकाश गाडे अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे तपास करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट