कंपनीत रसायनांचा स्फोट घडवून १३ व्यक्तींच्या मृत्यूस व ५५ व्यक्तींच्या गंभीर जखमेस कारणीभूत झालेल्या आरोपी मळ्या मेहतावर गुन्हा दाखल..

उपसंपादक – रणजित मस्के
मानपाडा :– ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसी हद्दीत मे. अमुदान केमीकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये दि. २३/०५/२०२४ रोजी १३:४० वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने त्यात आतापावेतो १३ व्यक्ती मयत झाल्या असुन अजुन सुमारे ५५ लोक जखमी झाले आहेत.
सदर घटनेवरुन मानपाडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७१४/२०२४ भा.द.वि ३०४,३२४,३२६ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील मुख्य आरोपी मलया प्रदीप मेहता, वय ३८ वर्षे यास गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडुन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरोपी मलया मेहता याची आई मालती मेहता यांना गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडुन नाशिक येथुन ताब्यात घेण्यात आले असुन त्यांची चौकशी करुन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. सदर गुन्हयाचा तपास मानपाडा पोलीस स्टेशन यांचेकडुन गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंजाबराव उगले यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. पराग मणेरे व श्री. शिवराज पाटील यांचे नेतृत्वात सहायक पोलीस आयुक्त, शोध १ श्री. निलेश सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, स्पेशल टास्क फोर्स श्री. शेखर बागडे, पोलीस निरीक्षक श्रीमती वनिता पाटील, सपोनि श्री. सुनील तारमाळे, सपोनि गोरे, पोउपनि राठोड, पोहवा ठाकुर, पोहवा भोसले, पोना हिवरे, पोकॉ तानाजी पाटील यांनी कामगिरी पार पाडली..
गुन्हयाची पद्धत
कंपनीतील रासायनिक प्रक्रिया तसेच कच्चे मालाची आणि अंतिम उत्पादनांच्या साठवणुकीबाबत योग्य खबरदारी न घेतल्यास यातील रसायनांचा स्फोट होवुन त्यामुळे सदर कंपनीत अथवा आजुबाजुचे कंपनीतील कामगारांना क्षती पोहचुन त्यांचा मृत्यु घडुन येवु शकतो याची जाणिव व माहीती असताना कंपनीतील कामगाराचे मृत्युस कारणीभुत होणे.
१० थोडक्यात हकीकत
यातील आरोपी यांनी त्यांचे मालकीचे फेज २, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथे प्लॉट नं. २२९ वर असलेल्या मे. अमुदान केमिकल्स प्रा.लि. या कंपनीमध्ये ज्वलनशील आणि स्फोटक अशी अॅल्युमिनीयम आयसोप्रॉक्साईड, डायटररी ब्युटेल पेरॉक्साईड, टरसरी ब्युटेल पेरबेन्झोट, डाय मिथील पायथॉलेट, टरसरी ब्युटेल हायड्रो पॅराअॅक्साईड, मिथी इथील केटोन पॅराअॅक्साईड, टरसरी ब्यूटीन पियोलेट, कमेन हायड्रो पॅराअॅक्साईड, बेन्झाल पॅराअॅक्साईड, टरसरी ब्युटेल ऑकेट या रासायनिक पदार्थांचे उत्पादन व वापर करीत असताना या उत्पादनांशी संबंधीत रासायनिक प्रक्रिया तसेच कच्चे मालाची आणि अंतिम उत्पादनांच्या साठवणुकीबाबत योग्य खबरदारी न घेतल्यास यातील रसायनांचा स्फोट होवुन त्यामुळे सदर कंपनीत अथवा आजुबाजुचे कंपनीतील कामगारांना क्षती पोहचुन त्यांचा मृत्यु घडुन येवु शकतो याची जाणिव व माहीती असताना गुन्हयातील आरोपी यांनी त्यांचे कंपनीमध्ये वरील नमुद उत्पादने तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्याने दिनांक २३/०५/२०२४ रोजी दुपारी १३.४० वा.ये सुमारास सदर कंपनीमध्ये भीषण स्फोट होवुन सदर कंपनी व लगतच्या कंपन्यामधील कामगार नामे १) रिध्दी अमित खानविलकर, वय. ३८ वर्ष २) रोहिणी चंद्रकांत कदम वय. २६ वर्ष व ३ अनोळखी पुरूष इसम असे एकूण ५ इसमांचा मृत्यू होणेस तसेच स्फोटामुळे सदर कंपनीचे व आजुबाजुच्या सप्तवर्ण, डेक्कन कलर, ओमेगा व इतर कंपन्याचे तसेच घटनास्थळाच्या २ ते ३ किमी परीघातील रहीवाशी इमारतीचे पत्रे, काचा, खिडक्या इ. फुटुन तसेच रस्त्यावरील वाहनांचे नुकसान झाल्याने तसेच आजुबाजुचे कंपन्यामधील व रहीवाशी भागातील सुमारे ५५ कामगार/इसमांना साध्या व गंभीर दुखापती झाल्याने, तसेच घटनास्थळ परीसरातील सार्वजनिक रस्ते, विजेचे खांब व तारा इत्यादी सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्याने वर नमुद धोकादायक, ज्वलनशील आणि स्फोटक रसायने इत्यांदी कच्चा माल म्हणुन वापरणाऱ्या तसेच त्यावर प्रक्रिया करणाऱ्या किंवा अशा प्रकारची अंतीम उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यामधील सुरक्षिततेच्या उपाय योजनांप्रती जबाबदारी असणाऱ्या सर्व संबंधीत वरीलप्रमाणे आरोपीविरूध्द गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com