जबरी चोरी करणाऱ्या टोळीस स्था. गुन्हे शाखा व पो. ठाणे सालेकसा डी. बी. पोलीस पथकाने अवघ्या 24 तासाचे आंत केले जेरबंद…

उपसंपादक – रणजित मस्के
गोंदिया :-गुन्ह्यातील जबरीने हिसकावून चोरी केलेला निकॉन कंपनीचा कॅमेरा, आणि गुन्ह्यांत वापरलेली मो. सा. असा किंमती 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत केलाय जप्त..
▶️. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, घटना ता. 21-05-2024 रोजी चे सायंकाळी 19.00 ते 20.00 वाजताचे दरम्यान फिर्यादी नामे – विक्की राधेलाल उके वय 25 वर्ष रा. बाजपई वार्ड, गौतम नगर, गोंदिया , व्यवसाय- फोटोग्राफर हा आपल्या मित्रासोबत कोटरा डॅम वर फोटोशूट करित असतांना चार अनोळखी गुन्हेगार ईसम् वय अंदाजे 20 ते 25 वर्ष वयोगटाचे तोंडाला पांढरी दस्ती बांधलेले व हातात लाकडी काठ्या घेवुन असलेल्यांनी फिर्यादीस काठीने हाता- पायावर मारहाण करून फिर्यादी जवळील निकॉन कंपनिचा कॅमेरा, जबरीने हिसकावुन घेतल्याचे व फिर्यादीचे मित्र नामे.- यासीन याला थापड बुक्यांनी मारहान करून, साहिल डोये यास पाठीवर थापडीने व काठीने मारून त्याचेजवळ असलेला विव्हो कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून चोरून नेल्याचे तक्रारीवरून पो. ठाणे सालेकसा येथे गुन्हा अपराध क्रमांक 150/2024 कलम 394, 34 भा.दं.विं अन्वये दाखल करण्यात आले होते…..
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग आमगाव श्री. प्रमोद मडामे, यांनी सदर गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ गुन्ह्यांत जेरबंद कऱण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस, व सालेकसा पोलीसांना दिले होते..
या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात स्थागुशा चे पोलीस पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असता गुन्ह्यातील गुन्हेगारांची इत्यंभूत माहिती प्राप्त करून शोध घेत असताना पथकास गोपनीय बतमिदराकडून माहिती प्राप्त झाली की, सदर गुन्हा करणारे गुन्हेगार हे बंडू चौक, गोविंदपुर गोंदिया येथील रहिवासी असून त्यांनीच नमूद गुन्हा केला आहे… अश्या प्राप्त खात्रीशीर माहितीच्या आधारे स्थागुशा पथकाने जबरी चोरी करणारे गुन्हेगार आरोपी नामे-
1) हर्ष विनोद गेडाम वय 21 वर्षे
2). मंगेश गणेश खडसे व 22 वर्षे
3) हर्ष जितेंद्र वैद्य वय 19 वर्षे
तिन्ही राहणार- बंडू चौक , गोंविदपुर, गोंदीया*
4) साहिल गजानन डोये वय 18 वर्षे राहणार..जवरी, तालुका आमगाव, जिल्हा – गोंदिया
यांना ताब्यात घेवून जेरबंद करण्यात आले…. नमूद गुन्हेगार आरोपीतांना नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी विचारपूस केली असता गुन्ह्यात आणखी एक गुन्हेगार सोबत असल्याचे सांगून स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता नमूद गुन्हा केल्याचे सांगून गुन्ह्याची कबूली दिली…… आरोपीतांचे ताब्यातून गुन्ह्यातील जबरीने हिसकावून चोरी केलेला 1) निकॉन कंपनीचा कॅमेरा किं. 80,000/- रूपये, गुन्ह्यांत वापरलेली 2) मो. सा. हिरो एच एफ डिलक्स कंपनीची किं. 50,000/- रूपये असा किंमती 1 लाख 30, हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला आहे…
आरोपी क्र. 1 ते 4 यांना गुन्ह्याचे अनुषंगाने पुढील तपास प्रक्रिया कायदेशीर कारवाई करीता पोलीस ठाणे सालेकसा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे…… सदर गुन्ह्यात कलम 395, 120 (ब) भा.दं. वि. नुसार कलमवाढ करण्यात येत असुन पुढील कायदेशीर कारवाई गुन्ह्याचे तपास पो. ठाणे सालेकसा पोलीस करित आहेत…
सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग आमगाव,श्री. प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, पो. ठाणे सालेकसा चे पो.नि. श्री. भुषण बुराडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोउपनि महेश विघ्ने, मपोउपनि वनिता सायकर, पोलीस अंमलदार- सोमेंद्र तुरकर, विठ्ठलप्रसाद ठाकरे, तुलसीदास लुटे, घनश्याम कुंभलवार, तसेच पो. ठाणे सालेकसा येथील पोलीस पथक पोउपनि- अजय पाटील, पोलीस अंमलदार- इंगळे , गौतम, कटरे, चुलपार, अग्निहोत्री यांनी कामगिरी केलेली आहे..
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com