सागरी पोलीस ठाणे सागरी कवच अभियान अनुषंगाने सातपाटी समुद्रात १२ रेड फोर्स जवान ताब्यात…

प्रतिनिधी – मंगेश उईके
पालघर :– पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच पालघर अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कवच अभियान अनुषंगाने २२/०५/२०२४ सातपाटी समुद्रात खाजगी बोटीने पेट्रोलिंग करीता असताना सातपाटी समुद्रातून सातपाटी जेटीकडे येणा-या कामधेनू बोट चेक केली असता सदर बोटीत ६ रेडफोर्स जवान मिळून आले.




तसेच घरची लक्ष्मी बोटीची तपासणी बोटीवरील इसम यांचेकडे अधिक चौकशी केली असता ६ रेड फोर्स जवान मिळून आलेले असुन सर्व रेडफोर्स जवान यांना ताब्यात घेतलेले असून पुढील कार्यवाही करीत आहोत.
सोबत पो.ह.भारत सानप पो. ह. सौदागर रगडे पो. शि. योगेश छानवाल पो. शि. ओमानंद माने होते.अशी माहिती सातपाटी पोलीस स्टेशन स.पो.नि. प्रेमनाथ ढोले यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com