नायगाव गुन्हेप्रकटिकरण शाखेकडुन मेर्फेड्रॉन ( एम. डी . ) या अंमली पदार्थाची विक्री करणारया आरोपीतास जेलबंद करण्यास यश..

0
Spread the love

प्रतिनिधी – अक्षय कांबळे

नायगाव :- नायगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २५/०४/२०२४ रोजी नायगाव पोलीस ठाण्याचे हजर असतांना सपोनि / गणेश केकान यांना नायगाव पूर्व टिवरी गाव नवकार बिल्डींग नं ०३ समोरील चाळीजवळ एक इसम मेफेंड्रॉन (एम.डी.) नावाचा अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर कारवाई करणेबाबत मा. वरिष्ठांच्या कारवाई करण्याकरिता दिलेल्या आदेशाने पोलीस निरीक्षक मंगेश अधारे व गुन्हे प्रकटिकरण अधिकारी व अंमलदार यांचेसह कारवाई करणेकामी टिम तयार करुन नवकार बिल्डींग नं ०३ येथील चाळीसमोरील रोडलगत टिवरि नायगाव पुर्व ता. वसई जि. पालघर या परीसरात कोणाला ओळखू येणार नाही अशा पध्दतीने सापळा रचून थांबुन राहीलो.

त्यानंतर १९.५० वा. च्या सुमारास एक एक्सेस स्कुटर वरुन एक इसम सदर ठिकाणी आला असता त्यावेळी आमच्या गुप्तबातमीदार याने सदरचा इसम हा तोच असल्याचे सांगुन तो निघुन गेला. वरीष्ठांचे इशा-यावरुन सदर इसमास सापळा लावलेल्या पोलीसांनी एक्सेस स्कुटरसह ताब्यात घेतले. सदर इसमास त्यांचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता शानु वसीम कुरेशी, वय-२८ वर्षे, व्यवसाय – बेकार राहणार- रुम नं १०१ / एविंग, बिल्डींग नंबर ०१, मरीमनगर, नायगाव पश्चिम, ता. वसई जि.पालघर असे सांगीतले.

सदर इसमाच्या ताब्यात असलेल्या एक्सेस स्कुटरची सीट चेक केली असता सदर सीटच्या नाली एक प्लास्टीक पिशवीत पांढ-या रंगाचा ५०,००० /- रु रुपये किंमतीचा मेफेंड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ बेकायदेशीर बाळगत असतांना मिळुन आला. तसेच सदर गुन्हयात करीत असताना चापरण्यात आलेला सुझकी एक्सेस व आरोपीत यांचा मोबाईल असा एकुण १,२०,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर बाबत नायगाव पोलीस ठाणे गु. रजि.नं.२२१/२०२४ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस अॅक्ट) कलम ८ (क),२१ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास हा पोउपनिरी/अशोक गुजाळ हे करीत आहेत.

तसेच त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये सदर आरोपीत हा खालील गुन्हयात पाहिजे आरोपीत असल्याबाबत निष्पन्न झाले आहे.

अ.क्रं. पोलीस ठाणे व गुन्हा रजि नंबर व कलम
०१ तुळींज पोलीस ठाणे गुन्हा रजि नं ८३४ / २०२३ एनडीपीएस कलम ८ (सी), २१ (ब) प्रमाणे

वरील कामगीरी श्रीमती पोर्णिमा चौगुले, पोलीस उप आयुक्त सो परीमंडळ – २ वसई, श्रीमती पदमजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सो, वसई विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) मंगेश अंधारे गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, सपोनि / गणेश केकान, सपोनि / रोशन देवरे, पो. अंम. सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट