बँकेचे एटीएम सेंटरमध्ये जेलेटिनच्या सहाय्याने स्फोट घडवून दरोडा टाकणार्या टोळीस उंब्रज पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

उपसंपादक- रणजित मस्के
सातारा :-पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली तळबीड उबंज पोलीस ठाणेची संयुक्त कामगीरी) बँकेचे ए टी एम सेंटरमध्ये जेलीटीन कांडयाच्या सहाय्याने स्फोट घडवुन दरोडा टाकणेचे तयारीत असणा-या टोळीस दरोडाच्या साहीत्यासह प्रसंग अवधान राखुन शिताफीने केले जेरबंद.
मा. पोलीस अधिक्षक साो सातारा व अप्पर पोलीस अधिक्षक सो सातारा तसेच मा उपविभागीय पोलीस अधिकारी सो फराड विभाग कराड यांनी लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने सातारा जिल्हाष्हद्दीत अधिकार व अमंलदार यानी सर्तक रात्रग्रस्त करणे बाबत सुचना देण्यात आले होत्या स्याप्रमाणे तळबीड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि.श्री. किरण भोसले यांना दि १६/०५/२०२४ रोजी कराड विभागीय रात्रग्रस्त होती त्यांचे सोबत पोलीस ठाणेकडील पो. काँ ८९३ विभुते व चालक पो. की २४३१ पाटील हे होते शासकीय वाहनाने रात्रग्रस्त पेट्रोलिंग करीत असताना उब्रज पोलीस ठाणे हद्दीत शिवडे या गावाजवळी कृष्णा पुलाच्या अलिकडे रोडच्या बाजुस अपारात पाच ईसम दिसले त्याच्या संशय आल्याने शात्तकीय याहन काही अंतरयरीती भाबवुन उब्रज पोलीस ठाणेशी संपर्क करुन मदतीसाठी पोलीस ठाणेकडील स.पो.नि श्री भोरे व स्टाफ यांना तात्काळ बोलावुन घेवुन व तळबीड व उद्घज पोलीस ठाणेकडील अधिकारी व स्टाफ यांनी चार संशयीत ईसमाना घेराव घालुन ताब्यात घेतले त्याच्या एक साथीदार अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला, ताब्यात घेतलेल्या इंसगांचि नामे पुढील प्रमाणे
१) वैभय राजेंद्र साळुंखे वय ३३
(२) ओंकार बाळासाहेब साळुंखे वय २३ (३) अदित्य सतोष जाधय वय १९ रा मोळाचा ओडा सातारा जि सातारा व
(४) विधीसंघर्ष बालक
(५) पळून गेलेला नांय गायं माहीत नाही
ताब्यातील इसमांची अंगझडती मध्ये व त्यांच्या कब्जातुन खालील प्रमाणे दरोड्याचं साहीत्य मिळुन आले
१) ०३ लहान मोठे कटायणी,
(२) ०४ जिलेटीन कांडया
(३) डेटोनेटर
(४) लहान मीटरी
(५) एक्सा ब्लेड दोन
(६) मोठी करयत
(७) कोयता
(८) ब्लॉस्टीगची बायर
(९) दोन मोटार सायकल वाहन
(१०) तोडाचे मास्क याप्रमाणे एकुण १,३७,९८०/- (एक लाख सदतीस हजार नवशे रुपये) किमतीचे साहीत्य मिळुन आले. वरील इसमांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सुमारे आठ दिवसापासुन मसुर येथील हीताची कंपनीचे एटीएम सेंटर जेलीटीने स्फोट घडवुन दरोडा टाकणेचे प्लानिंग केले होते.
त्याप्रमाणे त्यानी चार ते पाच दिवासापुर्वी त्या एटीएम सेंदरच्या ठिकाणी रेखी करुन आले होते. व आज रोजी ते ठरलेल्या प्लानिग प्रमाणे सदरचे एटीएम सेंटर जेलीटीने स्फोट घडवुन दरोडा टाकणेच्या तयारीत असतानाच त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील होणारी मोठी घटना टळलेली आहे. यापैकी संशयीत ईसम वैभव राजेंद्र साळुंखे याच्या विरुध्द कोरेगावं, बडुज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com