कराड डी.बी. पथकाने एका सराईत मोटर सायकल चोराला ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

कराड :-तब्बल 15 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 17 मोटर सायकल केल्या जप्त श्री. समीर शेख सो. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो. सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. यांनी कराड शहरात तसेच उप नगरात होणाऱ्या मोटर सायकल चोरी बाबत विशेष आढावा घेवून कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री के. एन. पाटील सो. यांना मोटर सायकल चोरीच्या गुन्हयाचा तात्काळ छडा लावणेबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील सो. यांनी व्यूह रचना तयार केली. आणि सदर कारवाईस मोठे यश मिळून कराड डी. बी. पथकाने एका सराईत मोटर सायकल चोरास मोठ्या शिताफीने अटक् करुन 15 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 17 मोटर सायकल जप्त केल्या आहेत. मागील काही वर्षातील चोरीच्या मोटर सायकल जप्त करण्याची हो सर्वात् मोठी कारवाई मानली जात आहे.

दिनांक 13/05/2024 रोनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील सो. यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक यांना कराड शहर तसेच उप नगरात गस्त करणेबाबत आदेशित केले होते. सायकांळी 17.30. वाजताचे सुमारास आगाशिवनगर परिसरात गस्त करीत असताना एक इसम संशयीत रित्या मोटर सायकल वर फिरताना दिसुन आला पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर इसमास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याचे ताब्यातील मोटर सायकल कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

सदर आरोपीस पोलीस ठाणेस आणुन पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील सो. यांनी त्यांचे तपास कौशल्याचा वापर करुन डी. बी. पथकाचे मदतीने अधिक तपास केला असता नमुद आरोपीने कराड शहर व इतर पोलीस ठाणे हद्दीतुन एकुण 17 मोटर सायकल चोरी केल्याचे सांगितले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव-प्रकाश बाबासो निबाळकर वय 45 वर्षे रा.मौजे सांगाव ता. कागल जि. कोल्हापुर असे असुन त्याचे ताब्यातून पुढील प्रमाणे 15 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या एकुण 17 मोटर सायकली जप्त करत

कराड शहर पोलीस ठाणेचे पुढोल
गुन्हे उघड केले आहेत.

गुरन 1269/24 भादवि कलम 379 MHII AR 9065,

गुरन 358/24 भादवि कलम 379 MH 50Q 0183

गुरन 52/24 भादवि कलम 379 MH 50B 3417

गुरन 605/24 भादवि कलम 379 MH 50 0 7788

गुरन 660/24 भादवि कलम 379 MH 50K 4090,

गुरन 694/24 भादवि कलम 379 MH 50 P 4925,

वडगाव पोस्टे 193/24 भादवि क 379 MH09DY0582,

नबंर प्लेट नसलेली चेसिस नबरं 06J1C38851

गोकुळ शिरगाव पोस्टे 15/24 भादवि क 379 MH 09 DW 4287

गुरन. 1334/23 भादवि कलम 379 MH 50 F 9702

गुरन 597/24 भादवि कलम 379 MH 50 K 3779

गुरन 657/24 भादवि कलम 379 MH 50 Η 5332 गुरन 1207/23 भादवि कलम 379 MH 09DB 1048,

गुरन 695/24 भादवि कलम 379 MH 11BM 268

गुरन 693/24 भादवि कलम 379 MH 09 0 5762,

MH 09 FK 6177).

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो. सातारा
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील सो, सफौ रघुवीर देसाई, नागनाथ भरते पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, बाळासाहेब जगदाळे, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष
पाडळे, अनिल स्वामी, पो.शि. महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील यांनी केलेली आहे. सातारा पोलीस अधिक्षक कार्यालय, सातारा

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट