पुण्यात अवघ्या साडेचार वर्षात दुर्वा अमोल वाघ हिची राज्यस्तरीय आदर्श क्रीडा रत्न पुरस्कार 2024 साठी निवड

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

पुणे :-दूर्वा अमोल वाघ रा ओम शांती ओम सोसायटी आंबेगाव बुद्रुक कात्रज पुणे , मुळगाव दासखेड , ता पाटोदा जिल्हा बीड अशा छोट्याशा खेडेगावातील मुलीने अवघ्या साडेचार वर्षाच्या वयामध्ये आठ किलोमीटर स्केटिंग पूर्ण केले.

कीप ऑन रोलिंग स्केटिंग अकॅडमी बारामती येथे आयोजित करण्यात आले होते. ट्रॉफी देऊन सत्कार समारंभ करण्यात आला. दुर्वा ही सध्या रॉक ऑन विल स्केटिंग अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे .

तिचे कोच विजय मलजी सर
यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंग क्रीडा प्रकारात विविध ठिकाणी यश प्राप्त करीत कर्तबगारी दाखवत आहे.
दुर्वा ही रॉक ऑन व्हील या अकॅडमीत वयाच्या साडेतीन वर्षापासून रोलर स्केटिंग शिकत आहे. जिल्हा पातळीवर यशस्वी होत ती राज्य पातळीसाठी पात्र ठरलेली आहे. आत्तापर्यंत 5 सुवर्ण 6 रौप्य आणि कास्यपदक 4 अशी 15 पदके मिळालेली आहेत.

नुकत्याच पुण्यात झालेल्या Extreme रेकॉर्डस, नॅशनल रेकॉर्डस आणि एशिया पॅसेफिक रेकॉर्ड्स मध्ये आपले नाव तिने नोंदवले आहे. आणि पुढे ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयारी करत आहे. अतिशय कमी वयात अत्यंत गोड अशा या चिमुरडीने केलेल्या या कामगिरीबद्दल राज्यस्तरीय क्रीडा रत्न आदर्श पुरस्कार 2024 साठी तिची निवड करण्यात आली आहे. अशा विविध ठिकाणी तिचा सत्कार सन्मान करण्यात येतो भरभरून कौतुक करण्यात येते दुर्वा ही सरहद प्री प्रायमरी स्कूल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे शाळेत देखील एक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विद्यार्थी ठरत आहे.

स्केटिंग क्रीडा प्रकारामध्ये दुर्वा ने देशाचे प्रतिनिधित्व करावे अशा या गोड मुलीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट