देवरी पोलीसांनी अवैध जनावरे यांची वाहतुकी विरोधात कारवाई करून 16 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका..

उपसंपादक- रणजित मस्के
गोंदिया :– ▶️ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कैंप देवरी, श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर अंकुश लावण्या करीता दर्जेदार धाडी घालून प्रभावी कारवाया करण्याचे निर्देश दिले आहेत.
या अनुषंगाने उपविभाग देवरी अंतर्गत क्षेत्रात उपविभागीय पोलीस अधीकारी, उपविभाग देवरी, श्री.विवेक पाटील, यांचे मार्गदर्शनात अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्याकरिता प्रभावी दर्जेदार धाडी घालून कारवाया करण्यात येतं आहेत……. दिनांक 13/05/2024 रोजी पहाटे पोलीस ठाणे देवरी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे – हायवे रोड क्र. 53, मौजा पुतळी फाटा येथे नाकाबंदी लावून सापळा रचून कारवाई केली असता….आमगाव वरुन नागपुरकडे हायवे रोडनी ट्रक क्र. एम.एच 40, सीडी- 4920 दिसून आल्याने त्यास थांबवून सदर ट्रक चे डाल्याची पाहणी केली असता..ट्रक चे मागील डाल्यात अवैधरित्या एकूण 16 गोवंश जातीची जनावरे दाटीवाटीने त्यांच्या चाऱ्या पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता निर्दयतेने कोंबलल्या स्थितीत दिसून आल्याने सदर वाहनाचा चालक 1) सचिन ईस्वर फुंडे वय 37 वर्ष, रा. केसलवाडा, ता. पवनी, जि. भंडारा व त्याचा सोबती
2) सोहेब शकील शेख, वय 27 वर्ष रा.अडयाळ, ता. पवनी, जि. भंडारा, यांचेकडुन त्यांचे ताब्यातील ट्रकसह त्यांचे ताब्यातील वाहनात निर्दयतेने कोंबुन भरलेले लाल, काळ्या, पांढ-या रंगाचे एकुण 16 गोवंश जातीचे जनावरे प्रती नग किंमती 6000/-रु. प्रमाणे एकुण- 96000/-रु. व जनावरे, वाहतुकी करीता वापरलेले वाहन अशोक लेलँड कंपनीचा ट्रक किंमती 10 लाख /- रु. असा एकुण 10 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.. गोवंश जातीची जनावरें सुरक्षिततेच्या दृष्टीने गौशाळेत दाखल करण्यात आले आहे..
आरोपी नामे- 1) सचिन ईस्वर फुंडे वय 37 वर्ष, रा. केसलवाडा, ता. पवनी, जि. भंडारा
2) सोहेब शकील शेख, वय 27 वर्ष रा.अडयाळ, ता.पवनी, जि. भंडारा,* यांचेविरूध्द पोहवा करंजेकर यांचे तक्रारीवरुन पोलीस ठाणे देवरी येथे अप. क्र. 152/2024 कलम 11 (1),(ड) प्रा.नि. वा.का.1960 सहकलम, 5 (अ), 9 म. रा.प्राणि संरक्षण कायदा सन- 1995 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना दिलीप हातझाडे, पोस्टे देवरी हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक गोदिया, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, यांच्या निर्देशानुसार, पो. नि. प्रविण डांगे, पो. ठाणे देवरी यांचे मार्गदर्शनात पोहवा करंजेकर, पोना हातझाडे, पोशी डोंहळे, मपोशी साठवणे, चापोहवा बडोले, यांनी केली आहे…
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com