मुंबई, पालघर जिल्ह्यांत एटीएम कार्ड चोरून पैसे काढणाऱ्या टोळीला काश्मीरा गुन्हे शाखेने गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या..

उपसंपादक- रणजित मस्के
भाईंदर :- मुंबई व पालघर जिल्ह्यांमध्ये एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या लोकांचे एटीएम कार्ड चोरून पैसे खात्यातून पैसे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. ही कारवाई मिरा- भाईंदरदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ च्या पथकाने गुजरात राज्यात केली. हे आरोपी हाती लागल्याने अनेक गुन्ह्यांची उकल झाली.
भाईंदर पूर्व परिसरातील बंदरवाडीजवळ, लक्ष्मी टॉवर, नवघर रोड, याठिकाणी असलेल्या एका नामांकित बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये अनिल लक्ष्मण जाधव (वय ५९) हे खात्याचे मिनी स्टेटमेट काढण्याकरीता गेले असता त्याचे एटीएम कार्ड हे मशिन मध्ये अडकले ते काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न करुन देखील निघाले नाही. त्या वेळी एटीएम सेंटरमध्ये एक अनोळखी इसम आला. त्याने अनिल याला एटीएमचा पिन टाकण्यास सांगितले. विश्वास ठेवून त्याने पिन नंबर टाकुन कॅन्सल बटन दाबले. परंतु एटीएम कार्ड बाहेर आले नाही. त्यानंतर अनिलने त्याचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्याकरीता फोन करत एटीएम सेंटरच्या बाहेर आला. हीच संधी साधून त्या इसमाने एटीएम कार्ड चोरले व त्याव्दारे वेगवेगळया एटीएम मधुन एकुण ५० हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी अनिलच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात (गु.रजि.नं. १ २३९/२०२४ भा.दं.वि.सं. कलम ३७९) गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष-०१ काशिमीराचे पथक समांतर करू लागले. तपासादरम्यान सदर गुन्ह्याचे घटनास्थळावरुन मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक गुजरातमधील वापीमध्ये दाखल झाले. तेथे सापळा लावून शिवशंकर रामु प्रसाद (वय २५ वर्षे, धंदा-मजुरी, रा. गाव झोझुरी, तालुका- बरखटटा राज्य-झारखंड), प्रिन्स विनोद जयस्वाल (वय २८ वर्षे, धंदा-चालक, रा रुम नं २०१, सोमा रेसिडन्सी, वापी, जि-वलसाड, राज्य गुजरात), उपेद्र सिंग रामप्रवेश सिंग (वय ४५ वर्षे, धंदा मजुरी, रा. रुम नं ए/४३९ रा. सोसायटी, ता-पलसाना, जि-सुरत) यांना ताब्यात घेतले.
आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी नवघर पोलीस ठाणे, मिरारोड, वसई, विरार, मालाड, कांदीवली, बोरीवली, माहीम, जोगेश्वरी, अंधेरी या ठिकाणी एटीएम चोरून अनेकांचे पैसे काढल्याची कबुली दिली.
ही कौतुकास्पद कारवाई पोलीस उप-आयुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीराचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, सपोनिरी पुष्पराज सुर्वे, हवालदार संतोष लांडगे, हवालदार सचिन हुले, हवालदार विजय गायकवाड, हवालदार समिर यादव, हवालदार सुधीर खोत, पोलीस नाईक सनी सुर्यवंशी, अंमलदार धिरज मॅगाणे, सायबर विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com