मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला २४ तासांतमध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुण्यात ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

पालघर :- पालघर जिल्ह्यातील अर्नाळा येथे अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मिरा-भाईंदर, वसई-विरारच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण पथकाने पुण्यात केली. अवघ्या २४ तासात आरोपीला पकडल्याने वरिष्ठांनी तपासी पथकाचे कौतुक केले.

अर्नाळा येथे ६ मे रोजी १७ वर्षीय मुलीने फिर्याद दिली की, यातील आरोपीत याने जानेवारी २०२४ ते ०७/०४/२०२४ पोचतो फिर्यादी यांचे राहते पत्यावर पिडीत महिला हि अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील तिच्याशी प्रेम संबंध ठेवुन तु अतरा वर्षाची झाल्यानंतर आपण लग्न करु असे म्हणून बळजबरीने वेळोवेळी शारिरिक संबंध ठेवले तसेच तु माझ्याशी संबध ठेवले नाहीस तर सदर संबंधाबाबत मी तुझ्या आईला सर्च सांगेल अशी धमकी दिली.

तसेच फिर्यादीने आरोपी सोबतचे शारिरीक संबध तोडल्याचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादी व तीच्या आईला ठोश्याबुक्यानी मारहान करुन धमकी दिली म्हणून फिर्यादीने दिलेल्या तक्रारी वरुन अर्नाळा पोलीस ठाणे गु.रजि.नं. १८८/२०२४ भा.द.वि.सं. कलम ३७६ (२) (एन), ३२३, ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील सपोनि दत्तात्रय सरक, हवालदार सतीश जगताप, हवालदार महेश वेल्हे आदी पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले.

या पथकाने तांत्रिक विश्लेषन करून आरोपीची माहिती प्राप्त केली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक पुण्यातील कोंढवा येथे रवाना झाले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी नामे धिरजकुमार बाळकृष्ण लड्डा (वय २५ वर्ष, राह. रूम नं ५०१, एक्स विंग, बुरानी पार्क, कन्ट्रीयुड हबटावुन जवळ, तिलीकानगर, कोडया, पुणे) याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पुढील कारवाईसाठी अर्नाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनांजय पिरे, सपोनि दत्तात्रय सरक, सपोनि नितीन बेन्द्रे, पोउपनिरी हितेंद्र विचारे, सहा.पो.उप.नि. श्रीमंत जेधे, हवालदार सतिष जगताप, महेश वेल्हे, हनुमंत सूर्यवं शी, मसुच सचीन चौधरी व सायबर सेलचे सहा.पो.उप. निरी संतोष चव्हाण यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट