कराड शहरातील कुप्रसिध्द गुन्हेगार धोकादायक इमस कुंदन जालींदर कराडकर याच्यावर MPDA कायदयान्वये स्थानबध्द कारवाई..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

कराड:-श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी दिलेल्या सूचनां प्रमाणे सन २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगार (धोकादायक व्यक्ती) यांचेवर कठोर प्रतिबंधक कारवाई करणेबावत सूचना देणेत आलेले आहेत.

कराड शहर स्टेशन हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार कुंदन जालीदर कराडकर वय २७ वर्षे रा. गजानन हौसिंग सोसायटी, सैदापूर ता. कराड जि. सातारा, याचे विरुद्ध MPDA कायदया अन्वये स्थानवध्द करणे बाबतचा प्रस्ताव श्री. कोंडीराम पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांनी सादर केलेला होता. नमूद प्रस्तावाची अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी पडताळणी करुन श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा व अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराड यांचे मार्फतीने MPDA कायदया अन्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सातारा कार्यालयास सादर करण्यात आलेला होता.

मा.श्री. जितेंद्र बुडी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सातारा यांनी स्थानबद्ध इसमाने स्वतः तसचे साथीदारांच्या मदतीने मृत्यू किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नांसहित जबरी चोरी किंवा दरोडा, मुत्यू किंवा जबर दुखापत यांची भिती पालून अपहरण करणे, जबरी चोरी करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासुन धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र वलप्रयोग करणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोच करण्याची पूर्व तयारी करुन गृहआगळीक करणे, दंगा मारामारी करणे, चोरी करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे हददपार आदेशाचे उल्लंघन करुन विनापरवाना हददापार केलेल्या क्षेत्रात प्रवेश करणे, सुर्यास्त व सुर्योदव यांचे दरम्यान संशावास्पद स्थितीत मिळून येणे असे गुन्हे केलेने तसेच स्थानबद्ध इसमाकडून सार्वजनिक शांततेस बाधा उत्पन्न होणारी कृत्ये होत असल्याने व तो धोकादायक व्यक्ती झालेची खात्री झालेने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी MPDA कायद्यान्वये कुंदन जालीदर कराडकर वय २७ वर्षे रा. गजानन हौसिंग सोसायटी, सैदापुर ता. कराड जि. सातारा याचा दिनांक ०८/०५/२०२४ रोजी पासून ०१ वर्षा करीता सातारा जिल्हा मध्यवती कारागृह येथे स्थानबद्ध करणेबाबतचा आदेश पारीत करणेत आला असुन त्यास ताब्यात घेवून सातारा जिल्हा मध्यवती कारागृह येथे स्थानबद्ध करणेत आले आहे.

नोवोवर २०२२ पासून १० मोक्का प्रस्तावामध्ये १२८ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत, म.पो.का. कलम ५५ प्रमाणे २५ उपद्रवी टोळयांमधील ८१ इसमांना, म.पो.का. कलम ५६ प्रमाणे २६ इसमांना, म.पो.का. कलम ५७ प्रमाणे ०३ इसमांना असे एकुण ११० इसमांविरुध्द तडीपार सारखी तसेच MPDA कायदद्यान्वये ०२ इसमांवरुध्द स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. भविष्यातही सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द मोक्का, हददपार, एम.पी.डी.ए. अशा प्रकारच्या कठोर कारवाई करणेत येणार आहेत.

श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा व त्यांचे मार्गदर्शनाखाली अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराड, सविता गजे उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण विभाग पाटण, अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, कोंडीराम पाटील, पोलीस निरीक्षक, पतंग पाटील पोलीस उपनिरीक्षक, संजय देवकुळे सहाय्यक पोलीस फौजदार कराड शहर पोलीस स्टेशन, पो. हवा. अमित सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तसेच पोलीस शिपाई आनंदा जाधव, महिला पोलीस शिपाई सोनाली पिसाळ व कराड शहर डी. वी. पथकातील सर्व अंमलदार यांनी MPDA कायद्यान्वये अंतर्गत कारवाई करणेसाठी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट