पोलीस पुत्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घेतली विशेष भेट…

प्रतिनिधी- मंगेश उईके
मुंबई :– आपल्या देशाचा सर्वोच्च पद आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर यांना भेटण्याचा प्रत्येक भारतीयांना स्वप्न असतं आज ते स्वप्न साकार झाला देशाचे प्रधानमंत्री यांची आज भेट झाली. मोदी साहेबांची भेट ही पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी करणाऱ्या कामाला प्रेरणा होती ज्यावेळेस प्रधानमंत्री साहेब भेट झाली.
त्यावेळेस महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची संकल्पना त्यांना सांगितली त्यावरच त्यांनी आवर्जून विचारलं पोलीस तो हमारे देश का महत्वपूर्ण अंग हे और आप जिसके लिए काम कर रहे हो वो बहुत सराहणी है साहेबांसोबत दोन मिनिट चर्चेला वेळ मिळाला महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर एज्युकेशन आणि रोजगार या विषयावर साहेबांनी विचारविनिमय केला युवकांना देशात काय अपेक्षित आहे आणि या महाराष्ट्रासाठी काय केलं पाहिजे हे एवढ्या मोठ्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीने विचारावं म्हणजे खरंच आपण किती भाग्यवान आहोत असे ते म्हणाले.



ज्यावेळेस पोलीस परिवार व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या अडचणी सांगितल्या त्यावेळेस मा.नरेंद्र मोदी साहेबांनी त्या शांततेने ऐकून घेतल्या याच्यावर लवकरच प्रत्येक अडचणीवर तोडगा काढू आणि प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांचा परिवार हा सुखी कसा राहील यासाठी प्रयत्न करू कारण या देशाची आणि या राज्याची जिम्मेदारी ही पोलिसांच्या खांद्यावर आहे खरंच आज अभिमान वाटला की आपण काम करत असणाऱ्या संघटनेचा कौतुक आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी करावं हीच आपल्या प्रामाणिकपणाची व कामाची पावती समजावी आज देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना भेटून मंत्रमुग्ध झालो.
आपले मनापासून आभारी आहे व महाराष्ट्रातील तमाम पोलीस परिवार व पोलीस बॉईज संघटना आपले धन्यवाद करत आहे. असे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी आभार व्यक्त केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com