गोंदिया पोलीसांनी मा. न्यायालयाचे आदेशाने घरफोडीच्या गुन्ह्यातील हस्तगत दागीने मुळ मालक मालकास केले परत..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

गोंदिया :– ▶️ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी मो. जाफर मो. अमीन कंडुरेवाला, वय ४८ वर्षे रा. व्यंकट किराणाच्या बाजुला सिव्हील लाईन गोंदिया हे दि. ९/५/२०२४ रोजी आपल्या परिवारासह नातेवाईकांना भेटण्यास नागपुर येथे गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने दि.०९/०३/२०२४ चे ११.०० वा. ते १०/०३/२०२८ च दुपारी ३.०० वा. दरम्यान फिर्यादीचे घराचे समोरील मुख्य दरवाज्याच्या कुंदा तोडुन घरात प्रवेश करुन बेडरुम मधील आलमारीत मध्ये ठेवलेले जुने वापरते सोन्या-चांदीचे दागिने, एक जुना सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचा टॅब मोबाईल कि. २,०००/-रु., व नगदी रोख रक्कम २५,०००/-रु असा एकुण १५,७२,०००/-रु चा माल चोरुन नेल्याने फिर्यादीचे तक्रारी वरुन गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे दि. ११/०३/२०२४ रोजी अपराध क्र. १२०/२०२४ क. ४५४,४५७,३८० भादवि अन्वये अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता…

मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया व श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनात गोंदिया शहर पोलीस ठाणे चे ठाणेदार श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्री. सोमनाथ कदम, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदारांसह केलेला आहे….. सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास बुध्दीकौशल्याने अतिशय शास्त्रोक्त पध्दतीने करुन मिळालेल्या माहितीच्या आधारे अभिलेखावरील अट्टल आरोपी साहिल उर्फ माटया राजु आंबेकर, वय २४ वर्षे, रा. विठ्ठल मंदीर वार्ड, निबांळकर वाडी चंद्रपुर यास गुन्हयात अटक केली… त्याचेकडे सखोल तपास केला असता आरोपीने दिलेल्या कबुली प्रमाणे त्याच्याकडुन गुन्हयात चोरीस गेलेले १) सोन्याचे कंगन १ जोडी, कि.अं. ३,९०,०००/-रु., २) सोन्याचे कंगन १ जोडी अं.किं. ३,६०,०००/-रु., ३) सोन्याच्या बांगडया ८ नग अं.कि. ४,२०,०००/-रु., ४) सोन्याचे कानातील झुमके ३ जोडी अं. किं. १,०९,०००/- रु., ५) सोन्याची अंगुठी ४ नग अं. किं. ४८,०००/- रु., ६) सोन्याची चैन पेंडलसह ५ नग अं. किं. ९२,०००/- रु., ७) सोन्याचे हार ३ नग अं.किं. १,२६,०००/- रु., ८) पांढऱ्या रंगाचे बेनटेक्स च्या अंगुठ्या ६ नग, ९) सोन्याचा पॉलीश केलेला हार असा एकुण १५,४५,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आलेला आहे…



सदर गुन्हयातील जप्त मुद्देमाल मा. न्यायालयाचे आदेशाने मुळ मालक फिर्यादी- मो. जाफर मो. अमीन कंडुरेवाला रा. व्यंकट किराणाच्या बाजुला, सिव्हील लाईन, गोंदिया यांना आज दि. ०९/०५/२०२४ रोजी श्रीमती. रोहीनी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया व श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक, गोंदिया शहर पोलीस ठाणे यांचे उपस्थितीत सुपुर्दनाम्यावर देण्यात आलेला आहे..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट