५ वर्षाच्या अल्पवयीन पीडीत मुलीवर विनयभंग व अतिप्रसंग करणाऱ्या नराधमास १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार दंडाची शिक्षा..

उपसंपादक- रणजित मस्के
गोंदिया:– ▶️ थोडक्यात प्रकरण असे आहे की, घटना ता. २३/०४/२०१९ चे २३/०० वा. ते २३/१० वा. दरम्यान अल्पवयीन, मुलगी वय ५ वर्ष हिस आरोपी नामे- किशोर रामू शेंडे, वय ३० वर्ष, रा. मोखे (किन्ही), ता. साकोली, जिल्हा -भंडारा याने पीडित अल्पवयीन मुलीस लग्न मंडपा जवळून शेतामध्ये नेवून पीडित सोबत अतिप्रसंग करून पळून गेल्याने फिर्यादी यांचे तक्रारी वरून पो.स्टे. तिरोडा येथे अप क्र. :- १५३/२०१९ कलम ३६३, ३६६ (A), ३७६ (A-B), ५११, ३५४, ३५४ (A) भा.द.वि., सहकलम ८, १२ पोस्को अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले होते…
माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला… तपासा दरम्यान आरोपीस गुन्ह्यात अटक करून आरोपी विरूध्द सबळ साक्ष पुरावे, परिस्थिती जन्य पुरावे गोळा करून तपासांअंती गुन्ह्याचे दोषारोप पत्र क्र. ५०/२०१९ अन्वये मा. न्यायालयात न्यायस्तव सादर करण्यात आले…… सदर गुन्ह्याचे स्पेशल केस क्र.- ४३/२०१९ अन्वये मा. न्यायालयात खटला चालविण्यात आला…
मा. न्यायालयात सदर खटल्याचे सुनावणीत आरोपी विरूध्द सादर करण्यात आलेल्या सबळ साक्ष पुरावे, परिस्थिती जण्य पुरावे युक्तिवाद नंतर आरोपी विरूध्द दोष सिद्ध झाल्याने…. ….मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सा. न्यायालय गोंदिया ( मा. वानखेडे साहेब) यांनी सदर गुन्ह्याचा न्यायनिवाडा करत सदर गुन्ह्यातील आरोपी नामे – किशोर रामू शेंडे, वय ३० वर्ष, रा. मोखे (किन्ही), ता. साकोली, जिल्हा- भंडारा, यास-
१) कलम ३६३ भा.द. वि. मध्ये २ वर्ष करावास व १,००० रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिने अधिक करावास
२) कलम ३५४ भा. द.वि. मध्ये ३ वर्ष करावास व २,००० रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने अधिक करावास
३) कलम ३७६ (A-B) भा. द.वि. मध्ये १० वर्ष करावास व ५,००० रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने अधिक करावास अशी शिक्षा ठोठावली आहे…
▶️ सदर गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी पो.उप. नि.लाला लोणकर, पो. स्टे. तिरोडा यांनी केलेला असून सरकार पक्षातर्फे मां. न्यायालयात सरकारी वकील श्री. पारधी, यांनी बाजू मांडली… सदर गुन्ह्याचे कोर्ट पैरवी न्यायालयीन कामकाज:- पो.हवा. मोहन भोयर,
पो. स्टे. तिरोडा यांनी पाहिले…
पोलीस अधीक्षक गोंदिया माननीय श्री निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. नित्यानंद झा, यांनी गुन्ह्याचा उत्कृष्ठ तपास व तपास कामात मदत करणारे तसेच न्यायालयीन प्रक्रियेत मदत करणारे सर्वांचे अभिनंदन कौतुक केले आहे..
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com