नांगलवाडी येथील वाळूमाफिया रवी महाडिक याचा जेसीबी ट्रॅक्टरवर महाड तहसीलदार यांची धडक कारवाई..

उपसंपादक : राकेश देशमुख
महाड:- महाड तालुक्यात दिवसा ढवळ्या काळ नदीपात्रात वाळू उत्खनन केले जात असून नदी खरवडणाऱ्या वाळू माफियांवर महाड तहसील कार्यालय मार्फत धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे.
महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्या आदेशाने कारवाई झाल्याचे समजते नांगलवाडी हद्दीत नदीपात्रात भोराव हद्दीतील संगम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात होते याची माहिती महसूल खात्याला मिळताच महाड तहसील कार्यालयाकडून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मंडळ अधिकारी काटकर व तलाठी सोनवणे तसेच अन्य तलाठी व नायब तहसीलदार भांबड यांनी कायदेशीर कारवाई करून अनधिकृत वाळू साठा जप्त केला असून वाळू माफिया रवी महाडिक यांच्यामार्फत वाळू उत्खनन केले जात असल्याचे समोर आले आहे.
वाळू उत्खनांसाठी वापरले जाणारे जेसीबी व ट्रॅक्टर यांचा पंचनामा केलेला आहे. परंतु सदरचे वाहन तहसील कार्यालयाने जप्त केले नसून वाळू माफिया यांच्या ताब्यात असल्याचे समजले आहे.त्यामुळे धडाकेबाज कारवाई होऊन देखील वाळू माफियांना दिलासा मिळत असल्याचे सर्वत्र चर्चा सुरू आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com