सांगलीत देशी बनावटी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस संजय नगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

सांगली:– मिळाला माल :-

१) ५०,०००/- रु एक सिल्वर रंगाची देशी बनावटी मॅग्झीन असलेली पिस्टल त्यास काळया रंगाची प्लॉस्टिक मुठ असलेली मॅग्झीन असलेली जुवाकिअ.

२) ४००/- रु दोन पितळी जिवंत काडतुस कॅपवर इंग्रजीमध्ये केएफ ७.६५ असे असलेली. ५०४००/- रु.

गुन्हयाची थोडक्यात हकीगत :-

वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपीत नामे ऋषिकेश दशरथ शिंदे वय २२ रा. पाटणे प्लॉट संजयनगर सांगली याने कोणताही शस्त्र बाळगण्याचा परवाना नसताना वरील वर्णनाचे पिस्टल अग्नीशस्त्र व काडतुसे हे अवैध रित्या ज्युबली कारखाना चोक ते आरटीओ ऑफिस कडे जाणारे रोडवरील असले बस स्टाफ जवळ या ठिकाणी अवैध रित्या स्वतःचे कब्जात बाळगुन मिळुन आले आहे म्हणुन वगैरे

मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सो. मा. अप्पर पोलीस अधिक्षक रितु खोखर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब जाधव सो. यांचे मार्गदर्शना खाली मा. बयाजीराव कुरळे सो पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन अवैद्य धंद्यावर करणारे संशयित इसमाच्यावर कारवाई करणेबाबत तोडी आदेश दिल्यानंतर पोहेकॉ/१६७६ कपील सांळुखे,, पोहेकों/७४७ दिपक गायकवाड, पोकों/१३१ आकाश गायकवाड, पोकों/१३६२ माणीक सावंत असे खाजगी वाहनाने संजयनगर पोलीस ठाणे हद्दीत लक्ष्मीमंदीर मंदीर येथे पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत पोहेकॉ/७४७ दिपक गायकवाड यांना बातमी मिळाली की, ज्युबली कारखाना चौक ते आरटीओ ऑफिस कडे जाणारे रोडवरील असले बस स्टाफ येथे एक इसम संशयितरित्या थांबले असुन त्याचेकडे संशयित वस्तु असण्याची शक्यता आहे अशी बातमी मिळाल्यानंतर वरील आरोपी यांचे ताब्यात वरील वर्णनाचा माल मिळुन आला आहे.

तसेच त्यांना सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट