गंगाझरी पोलिसांची अवघ्या एक तासात कॅमेरा चोरीच्या गुन्ह्याचा केला उलगडा..

उपसंपादक – रणजित मस्के
गोंदिया :– ▶️ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी नामे ललित सुरेश दमाहे व 19 वर्ष व्यवसाय- फोटोग्राफर राहणार- चुलोद, पोस्ट- दतोरा, तालुका जिल्हा गोंदिया हा दिनांक 30. 04. 2024 रोजी आपल्या मावस बहीण मयुरी कमल लील्हारे राहणार पारडीबांध हीचे लग्न कार्यक्रमाचे शूटिंग करिता आपल्या मित्रासह आलेला होता रात्री शूटिंग करून जेवण करून कमल लील्हारेच्या राहत्या घरी निकॉन कंपनीच्या z6 मॉडल कॅमेरा बॅटरी पॅक करून बॅगमध्ये ठेवून झोपण्याकरिता गच्चीवर गेला होता सकाळी उठून पाहीले तर त्याला त्याच्या कॅमेरा ठेवलेली बॅग दिसून आली नाही… परंतु त्याला कॅमेरा ची बॅग ठेवताना 1) दीप रणगिरे राहणार परसवाडा व 2) गगन बिरणवार राहणार निलागोंदी यांना पाहिले होते….अशा दोन्ही इसमावर संशय व्यक्त करून निकोन कंपनीच्या कॅमेरा बॅटरी व बॅग एकूण किंमत 64 हजार रुपये चोरून नेल्याची फिर्याद दिल्याने पो.स्टे.गंगाझरी ला अप.क्र.169/ 2024 कलम 380, 34 भा.द. वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते….. सदर गुन्ह्याचे तपासात गंगाझरी पोलिसांनी त्वरित संशयित आरोपी नामे-
1). आदित्य उर्फ दीप रेख लाल रनगिरे वय २० वर्ष राहणार परसवाडा तालुका, जिल्हा -गोंदिया
2) गगन दिलीप बिरणवार वय 20 वर्ष राहणार निलागोंदी
यांना ताब्यात घेण्यात आले, दोघानाही गुन्हाचे अनुषंगाने विचारपूस चौकशी केली असता…. यातील आरोपी क्रमांक- दोन याने कॅमेरा चोरल्याची कबुली दिल्याने गुन्ह्यातील चोरीस गेलेला कॅमेरा, बॅटरी व बॅग हस्तगत करुन जप्त करण्यात आले आहे..
मा. वरिष्ठांचे निर्देश मार्गदर्शनात सदरची कारवाई पोलीस स्टेशन गंगाझरीचे सहा.पो.नि. सोने यांचे मार्गदर्शनात तपास पथकातील पोलीस हवालदार राकेश भुरे, पोलीस शिपाई श्रीकांत नागपुरे व पोलीस शिपाई राजेश राऊत यांनी केली असून सदर गुन्हा एका तासाच्या आत उघडकीस आणलेला आहे..
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com