गळा आवळून, डोक्यात दगड घालुन खुन केलेले आरोपी दहीवडि पोलीसांनी २ तासात घेतले ताब्यात..

उपसंपादक- रणजित मस्के
सातारा :-दिनांक ०५/०५/२०२४ रोजी पहाटे ०६-०० वा.चे पूर्वी शिरवली ता. माण जि. सातारा येथील दादा रामचंद्र जगदाळे वय ३५ वर्षे याचा त्याचे राहते घरासमोर अंगणात कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणावरुन कशानेतरी गळा आवळून तसेच त्याचे डोकीत कशानेतरी मारुन खुन केला असलेबाबतची मधुकर ज्ञानदेव देवकर पोलीस पाटील शिरवली ता. माण यांनी दिले तक्रारीवरुन दहिवडी पोलीस स्टेशनला गु.र.न.२०३/२०२४ भा.द.वि.स. क. ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कैम्प वहुज यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीबाबत माहीती काढून त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना दिल्या. त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अङ्गस्य सोनवणे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने हालचाल करुन दहिवडी पोलीस स्टेशनकडील महीला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे यांचे सोबत तपास पथक तयार केले.
सदर गुन्हयाचे घटनास्थळी दहिवडी पोलीसांनी तात्काळ भेट देवून, घटनास्थळाची पाहणी करून घरातील लोकांना झाले प्रकाराचाचत विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, पहाटेच्या सुमारास कुत्री जोरजोराने भुकत असलेने मयत याचे वडील घराबाहेर आले त्यावेळी त्यांना त्यांचा मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसुन आला. व त्याचवेळी त्यांचे घरापुडुन ४ ते ५ लोक पळून जाताना दिसल्यामुळे त्यांनी घरातील इतर लोकांना उठवले त्यावेळी घराचे बाहेर लावलेला बल्ब कोणीतरी काढून बाजुला ठेवला होता. तसेच मयत याचा मोबाईल त्याच्या जवळ नव्हता अशी माहीती सांगुन दरोडयासह खुन असा बनाव रचला. परंतु त्यांनी सांगितलेली हकीगत घटनास्थळाची परीस्थीती यामध्ये विसंगती तसेच बनाव करत असल्याचा संशय आल्याने सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह घरात जवून पाहणी केली असता मयताचा मोबाईल घरात मिळून आला. त्यामुळे पुन्हा याबाबत प्रतिप्रश्न केले असता घरातील लोक उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्यामुळे त्यांना पोलीसी खाक्या दाखवुन विश्वासात घेवुन गुन्हयाचे सत्यपरीस्थीतीबाबत माहीती घेतली असता समजले की, सदर मयत व्यक्ती हा दारु पिवुन घरच्याना वारंवार घाणेरडया शिव्या देत होता. तसेच मयताची बहीनी हिचे चारीत्र्यावर संशय घेवून तिच्यावर वाईट नजर ठेवून होता.
तसेच आई वडीलांना मारहाण करणे, दारुसाठी पैसे मागणे, पुतण्याला व
वर्हीनीला मारुन टाकण्याची धमकी देणे यासारखे प्रकार करत असलेने त्याच्या प्रासाला कंटाळून शिरवली गांयचे यात्रेनिमित्त घरी आलेल्या मयताची बहीण, मयताचा अल्पवयीन पुतण्या यांचेसोबत मयताचे आई वडील यांनी कट रचून मयत दारु पियुन येवून झोपल्यानंतर मयताचे वडील रामचंद्र ज्ञानु जगदाळे, आई सी. कुसुम रामचंद्र जगदाळे, मयताची बहीण सी. रीला सचिन जाधव, मयताचा पुतण्या अल्पवयीन बालक यांनी संगणमताने मयतास सर्वप्रथम डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर त्याने प्रतिकार करायला चालु केल्यानंतर त्याचे हातपाय पकडुन जनावर बांधण्याच्या दोरीने त्याचा गळा आवळून निर्माण खून केला असलेचे निष्पन्न करुन सदरचा गुन्हा अवघ्या ०२ तासात उघडकीस आणला आहे.
श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, चांदणी मोटे महीला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार प्रकाश होंगे, बापू खांडेकर, प्रकास इंदलकर, विजय खाडे, स्वप्नील म्हामणे, पुनम रजपुत, महेश सोनवलकर, रामचंद्र गाढवे अजिनाथ नरबट, महेंद्र खाडे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com