३ वर्षाचे बाळ पालकांच्या ताब्यात परत दिल्याबद्दल दिवा पोलीस, ह्युमन राइट कौन्सिलचे विशेष आभार..

उपसंपादक- रणजित मस्के
दिवा :-काल रात्री अकरा वाजता युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारतच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णताई कदम यांना अंगणवाडी सेविका श्रीमती सरिता शेळके यांचा फोन आला होता त्यांच्या एरियामध्ये एक अडीच ते तीन वर्षाचा लहान मुलगा चुकून आला होता त्याला त्याचे नाव गाव काही सांगता येत नाही महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णाताई कदम यांनी त्वरित दिवा पोलीस चौकी मध्ये संपर्क साधून API श्री अमोल कोळेकर सरांना या गोष्टीची माहिती दिली .
त्यावेळी असे समजले की पोलीस स्टेशनमध्ये या मुलाचे मिसिंग कम्प्लेंट दिली गेलेली आहे आणि त्याचे आई-वडील त्याला शोधत आहेत त्यानंतर त्या मुलाला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस ह. श्री रवींद्र देसले आणि श्री कारगोडे यांच्या सहकार्याने मुलाच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले त्याबद्दल अंगणवाडी सेविका श्रीमती सरिता ताई शेळके यांचे आणि सर्व पोलीस कर्मचारी आणि श्री अमोल कोळेकर सर यांचे मनापासून धन्यवाद मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com