पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार दिपक साबळे, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना महाराष्ट्र दिनी पुणे येथे पोलीस महासंचालक पदक देऊन गौरव..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

पुणे :– महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिले जाणारे पोलीस महासंचालक पदक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते देऊन चव्हाण नगर पुणे येथे सन्मानित करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असणारे दिपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले यांनी पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर पडलेला मोठा दरोडा अनेक खून, घरफोड्या, वाहन चोऱ्या महिलांचे दागिने अशा अनेक चोऱ्याच्या गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच पंजाब मधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला खुनातील संशयित आरोपी संतोष जाधव याला गुजरात येथून महाराष्ट्रातून महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक करून त्याची संपूर्ण टोळी पकडून त्यांच्याकडून एकूण १५ पिस्टल जमा केल्या होत्या. अशा कामगिरीची दाखल घेत महाराष्ट्र पोलीस दला तर्फे या टीमला पोलीस महासंचालक पदक २०२३ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट