बालविवाह रोखण्यात दामिनी पथक आणि पो. ठाणे गोंदिया ग्रामीण यांना संयुक्तपणे यश..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

गोंदिया:– याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधिक्षक गोंदिया, मा.श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश, मार्गदर्शनाखाली महिला, मुली, शाळकरी बालके, विशेषतः मुली, युवती यांचे सुरक्षितता संबंधाने रात्र- दिवस गस्त पेट्रोलिंग व्दारे गोंदिया जिल्हा स्तरावर दामिनी पथक कार्य करीत आहे…. त्याचप्रमाणे कायद्याचे ज्ञान नसल्याने , अडाणीपणामुळे लहान मुले- मुली यांचे बालविवाहाचे आयोजन करून बालविवाह करणाऱ्याचे मनपरिवर्तन, समुपदेशन करून बालविवाह रोखण्याचे उल्लेखनीय कार्यसुध्दा दामिनी पथकाद्वारे केले जात आहे..

या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना, मार्गदर्शनाखाली दामिनी पथक जिल्ह्यांत गस्त पेट्रोलिंग द्वारे कार्य करीत असताना दामिनी पथकास आणि पो. स्टे. गोंदिया ग्रामिण, यांना खात्रीशिर गोपनिय माहिती मिळाली की, गोंदिया जिल्ह्यातील पो. स्टे. गोंदिया ग्रामिण हद्दीतील एका गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह दिनांक – 28/04/2024 रोजी नियोजीत केलेला आहे.

सदर प्राप्त माहिती च्या अनुषंगाने दामिनी पथक आणि पो. स्टे. गोंदिया ग्रामिण चे पो . स्टाफ यांनी संयुक्तपणे सदर ठिकाण गाठले व संबधीत गावाचे पोलीस पाटील यांचेसह मुलीचे राहते घरी पोहोचले त्यावेळी ज्या मुलीचे लग्न ठरले होते ती मुलगी व तीची आई त्यांचे राहते घरी हजर होते… अंगणात लग्नाचे मंडप आच्छादलेले होते….व लग्नाची संपुर्ण तयारी केली असल्याचे दिसून आले…. मुलीची व तिच्या आईची योग्य ती चौकशी केली असता संबधीत मुलगी हिने नुकतीच 9 व्या वर्गाची परीक्षा दिलेली असून तिचे शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केली असता त्या मुलीचे वय अवघे 16 वर्षे असल्याचे निदर्शनात आले… मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने मुलीची व तिच्या आईचे व नातेवाईक यांचे कायदा, आणि बालविवाह या बाबतीत उत्तम प्रकारे समुपदेशन करून सदर नियोजीत विवाह रद्द करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली पो.ठाणे गोंदिया ग्रामीण चे सहा.पोलीस निरीक्षक,श्री. वर्मा, पो.उप.नि. मट्टामी, दामिनी पथकातील मपोउपनि भावना राऊत, पोशि- राजेंद्र अंबादे, रमेंद्र बावनकर, मपोशि पुनम मंजुटे, भांदक्कर, चालक मपोशि- रंगारी,आणि पो. स्टे.गोंदिया ग्रामिण चे पोलीस हवा. मरहस्कोल्हे, इंद्रजित भुते, पो.शि. नागदेवे, मपोशि- शेंद्रे , गणविर तसेच बालविवाह मुक्त भारत अभियान चे ज्ञानेश्वर पटले, विशाल मेश्राम, पुजा डोंगरे, सुमित गोंडाणे यांनी संयुक्तपणे कार्यवाही करून नियोजीत बालविवाह रोखण्यात यश प्राप्त केले.

मा. वरिष्ठांनी दामिनी पथक आणि पो. ठाणे गोंदिया ग्रामीण पोलीस स्टाफ, आणि बालविवाह मुक्त भारत अभियान यांनी संयुक्तपणे अत्यंत कुशलतेने, आणि सामजस्याने बालविवाह रोखण्यात यश संपादन केल्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट