नंदुरबारच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकपदक जाहीर…

उपसंपादक- रणजित मस्के
नंदुरबार :– महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकरच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरिबद्दल आणि उल्लेखनीय/प्रशंसनीय सेवेबद्दल राष्यतीचे पोलीस पदक, पोलीस पदक, पोलीस शौर्य पदक व पोलीस महासंचालकाचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात येते. सालाबाद प्रमाणे सन 2023 या वर्षाकरिता उल्लेखनिय सेवेबद्दल नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील पोलीस अधिकारी व पाच गोलीस अंमलदारांचा समावेश आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर नेमणुक (स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार), पोलीस हवालदार नरेश ओंकार गुरव (नेमणुक नंदुरबार तालुका पोलीस ठाणे ) पोलीस हवालदार भिगी सत्तार ठाकरे (नेमणुक म्हसावद पोलीस ठाणे), पोलीस नाईक मोहन पांडुरंग ढमढेरे (नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार), पोलीस नाईक संदिप संतोष लांडगे (नेमणुक शहादापोलीस ठाणे), महिला पोलीस अंमलदार निंबाई रामा वाघमोडे (नेमणुक- नंदुरबार शहर पोलीस ठाणे) अशी पदक मिळालेल्या पोलिसांची नावे आहेत.
1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनी केलीस मुख्यालय नंदुरबार येथे होणाऱ्या पथसंचालनावेळी पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकरी व अंमलदारांना पोलीस महासंचालकपदक देऊन गौरविण्यात येणार आहे. या सर्व पोलिसांचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अभिनंदन करून पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com