दंडनगरी मधील मधली आली काप भावकी मंडळ आयोजित गौमाता चषक 2024 अतिउत्साहात संपन्न..

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

विरार :-मधली आली काप भावकी दंडनगरी तर्फे विरार तपस्या मैदानावर गौरी माता चषक 2024 रविवार दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते.

या सामन्या दरम्यान सर्व सहभागी झालेल्या सर्व काप भावकी कडुन सन्मान करण्यात आले.

या सामन्यात अनेक संघाकडून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला होता या सामन्यात सोळा संघाना प्राधान्य देण्यात आले होते

या चषक दरम्यान प्रथम पारितोषिक विजेते मानकरी अडखळ वण गाव

द्वितीय पारितोषिक विजेते -उमरोली गाव

तृतीय पारितोषिक विजेते :- वाजळोली

चतुर्थ पारीतोषिक विजेते-पणदेरी भोईवाडा

उत्कृष्ट फलंदाज:- उमरोलीचा गावचा प्रशात हुमने

उत्कृष्ट गोलंदाज:- अडखळवणचा अनिकेत महाडिक

मालिका विर- दिपेश लोखंडे अडखल

या सामन्याचे वितरण समारोह दरम्यान सर्व विजेत्यां संघाकडून मधली आली काप भावकी चे आयोजन बदल सर्व संघाकडून कौतुक करण्यात आले

या सामन्यात पंचाची भुमिका महत्वपुर्ण ठरली सर्व पंचाचे भावकी तर्फे आभार व सत्कार करण्यात आले.

प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक विजेता संघाच्या खेलांडुना मधली आली काप कडुन मेडल पुरस्कार जाहीर करण्यात आले .

या सामन्या दरम्यान काही प्रतिष्ठान कडुन चुक भुल झाली असल्यास काप भावकी कडुन दिलगीरी व्यक्त करण्यात आली .

या सामन्या दरम्यान अनेक दिग्गज खेळाडू व अनेक राजकीय सामाजिक व अनेक मान्यवर यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती व त्यांना काप भावकी कडुन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाची दखल सुरक्षा पोलिस टाईम्स या वृत वाहिनीने घेतली असून त्यांचे काप भावकी तर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट