शेजाऱ्याच्या घरात चोरी करणाऱ्याला बिबवेवाडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :–
पुणे : शेजाऱ्याच्या घरात चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पुणे पोलीस दलाच्या बिबवेवाडी पोलिसांनी केली. या कारवाईत ७ लाख १७ हजारांचे सोने-चांदीचे दागिणे जप्त करण्यात आले.
फिर्यादी हे राहत्या घराला कुलूप लावून मूळगावी सोलापुर येथे गेले होते. दरम्यान पुन्हा २ ऑक्टोबर २०२३ रोजी पुन्हा आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हॉलचे बाल्कनीच्या दरवाजाचा कड़ीकोयंडा तोडून घरात शिरला होता. बेडरुमधील लोखंडी कपाटाच्या ड्रॉव्हरमधील दागिणे पळवले. या प्रकरणी फिर्यादीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध (गुन्हा रजि. २०१/२०२३ भा.दं.वि.सं. कलम ४५४,४ ५७,३८०) गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे व तपास पथकातील अमंलदारांनी सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता दिपक नामदेव पाटोळे, (वय ४१ वर्षे रा. युग्म व्टिन्स सोसायटी, फ्लॅट नं.०८ पापळ वस्ती रोड, बिबवेवाडी, पुणे) याची माहिती समजली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. तपासामध्ये त्याच्याकडून चोरलेले ७ लाख १७ हजार रुपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त आर राजा, एसीपी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अमंलदार संतोष जाधव विशाल जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com