चांदोरे गौळवाडीतीळ लोकांना समाजापासून वंचित ठेवण्याची यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग कमिटीची धमकी…

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव रायगड:-माणगाव : माणगाव तालुक्यातील चांदोरे ग्रामपंचायत हद्दीतील चांदोरे गौळ वाडी या गावातील शेतकरी नागरिक सुधीर शांताराम दिवेकर यांनी माणगांव तालुका प्रतिनिधी यांच्याशी बोलतांना अशी खंत व्यक्त केली की, त्यांच्यावर यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग समाजाची कमिटी त्यांच्यावर अन्याय करीत आहे.

दोन वर्षापूर्वी त्यांच्या मुलीचे अंतर्जातीय विवाह हिंदू समाजाच्या रितीरिवजा प्रमाणे गावकीच्या सहमताने करून विवाह करारपत्रक सामाजिक फॉर्म सुध्दा भरले. आज लग्न होवून दोन वर्ष झाली आणि आता त्यांनी त्यांच्या मुलीचे आंतरजातीय विवाह केल्यामुळे यादव सहाय्यक समिति गोवेले स्थानिक समाजाची कमिटी त्यांच्याकडे १०,००० रू. दंड मागत आहे, कमिटीने या प्रमाणे नियमावली सुध्दा तयार केली आहे.की मुलाने अंतर्जातीय विवाह केला तर त्याला १५००० रू. दंड आणि मुलीने केला तर १०,००० दंड आणि विवाह करतांना लग्नपत्रिका छापल्या तर तो दंड डबल घेतला जातो. अन्याय फक्त त्यांच्यावरच होतो आहे असे नाही तर जो कोणी अंतर्जातीय विवाह करेल त्या प्रत्येकावर या कमिटीने असे दंड लावले आहेत हे असे दंड लावण्याचे अधिकार दंडाधिकाऱ्यांना आहेत की अशा सामाजिक संघटनांना? हे अधिकार असतील तर नागरिकांना जगणं कठीण होईल असे त्यांचे म्हणणे आहे.

सुधीर दिवेकर यांचे असे म्हणणे आहे की यादव सहाय्यक समिति गोवेळे स्थानिक विभाग समितीच्या वतीने १४/०४/२०२४ रोजी फळसप अग्ऱ्याचा कोंड येथे सामाजिक अधिवेशन घेतले होते, त्या वेळेस हा विषय घेण्यात आला. सुधीर दिवेकर स्वतः त्या ठिकाणी हजर होते, त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला १०,००० रू दंड भरावे लागतील परंतु त्यांनी ते मान्य केले नाही, म्हणून उपस्थित चांदोरे गौळवाडी ग्रामस्थांना या यादव सहाय्यक समितीच्या कमिटीने सांगितले की सुधीर दिवेकर जर का १०, ००० रू. दंड देत नसतील तर ते पैसे तुम्हा गावकीला भरावे लागतील आणि तुम्ही सुद्धा भरत नसाल तर आम्ही १६ गावची समिति आहे त्या समिती मधून तुमच गाव आम्ही वंचित ठेवून तुमच्या गावाला वाळीत टाकू असे वक्तव्य यादव सहाय्यक समिति गोवेळे विभाग कमिटी यांनी केले. या वक्तव्याला घाबरून गौळवाडी येथिल गावकिने सुधीर दिवेकर यांच्या वतीने १०.००० रू दंड भरला. या समितीचा हा मनमानी कारभार गेली काहीवर्ष चालू आहे, आज देश चाललाय कुठे आणि आपण कुठे आहोत?
न्यायव्यवस्था या विषयाकडे गंभीरतेने लक्ष देईल ही अपेक्षा दिवेकर यांनी व्यक्त केली आहे. हे प्रकार खूपच वाढत चालले आहेत या गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट