स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांचेकडून मोबाईलची चोरी करण-या आरोपीतांस करण्यात आली अटक…

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :-दिनांक २५/०३/२०२४ रोजी १५:०० वा चे सुमारास यातील फिर्यादी श्री. किशोर नथुराम मानकर वय ४५ वर्षे रा. चैत्यन्य संकुल बदलापुर जि. ठाणे हे त्यांचे मित्रांसह धुळीवंदन सणानिमीत्त आंघोळी साठी आंबेशीव नदीवर गेले असता त्यांनी त्यांचे मोबाईल त्यांचे अॅक्टीवा स्कुटीचे डिकीत ठेवले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे १०,०००/- रुपये किंमतीचे मोबाईल चोरुन नेले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन कुळगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक ३४/२०२४ भादंविसंक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे ग्रामीण जिल्हयात दाखल असलेल्या मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मा. श्री. डॉ. डी. एस स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण तसेच श्रीमती दिपाली घाटे, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांना आदेश देवुन मार्गदर्शन केले त्याप्रमाणे श्री. सुरेश मनोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी ठाणे ग्रामीण जिल्हयातील मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणणे कामी वेग-वेगळे पोलीस पथके तयार करुन त्यांना मार्गदर्शन केले.
सदर पथकाने गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रीक तपास करुन कोणताही धागा दोरा नसतांना अथक परीश्रम घेवुन आपले गुप्त बातमीदारांचे मार्फतीने सदरचा गुन्हा करणारा आरोपीताचा शोध लावुन इसम नामे भावीक महेंन्द्र सिंग वय २२ वर्षे रा. वालेकर होम्स, रुम नं.५०४, पोतदार स्कुल जवळ, अंबरनाथ जि. ठाणे यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्य पुर्ण तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्हयात चोरलेला १०,०००/- रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा ए/७ मॉडेलचा मोबाईल काढुन दिल्याने तो हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यास पुढील कार्यवाही कामी कुळगांव पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे श्री. सुरेश मनोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक/महेश कदम, पोहवा/२४०७ प्रकाश साईल, पोहवा/२५०७ संतोष सुर्वे, पोहवा /२७२३ प्रविण हाबळे, पो.हवा/७७९ सतीष कोळी, पोहवा/२८४२ हेमंत विभुते, पोहवा/७५६ गोविंद कोळी, पोहवा /१०७३ विजय भाईर, पोशि/३२८० स्वप्नील बोडके यांचे पथकाने कौशल्यपुर्ण उल्लेखनिय कामगीरी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com