वाट चुकलेल्या ३ वर्षीय मुलाची घरवापसी उल्हासनगर पोलिसांची कौतुकास्पद कारवाई..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

उल्हासनगर:– उल्हासनगर : वाट चुकलेल्या ३ वर्षीय मुलाची सुखरूप घरवापसी करण्यात आली. ही कारवाई उल्हासनगर पोलिसांनी केली. मुलगा परत मिळाल्याने पालकांनी पोलिसांचे आभार मानले.
१२ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजण्याच्या सुमारास मनोज सुकलाल दुबाळे (वय ३५ वर्षे धंदा सामाजिक कार्य रा. साईनाथ कॉलनी पोस्ट ऑफिसजवळ उल्हासनगर नं १)यांना ३ वर्षाचा मुलगा आईस्क्रीम दुकानासमोरील रस्त्यावर एकटाच रडतांना मिळाला. त्यांनी प्रसंगावधान राखत त्या मुलाला पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक पहाड यांनी त्वरित पोलीस पथकासह त्या मुलाच्या पालकांचा शोध सुरू केला. पोलिसांनी दयालू आईस्क्रीम दुकानाच्या आजुबाजुस राहणाऱ्या रहिवाशांकडे मुलाच्या नातेवाईकांबाबत चौकशी केली असता सदर मुलगा सौ नुरजहाँ शिबु सैयद यांचा असल्याचे सजले. त्यांचे राहते घर गाठले असता त्या मुलाचे नाव अनस (वय ३ वर्षे) असल्याचे समजले. घरामध्ये जेवन करत असतांना तो खेळत-खेळत बाहेर त्या मुलचे आईन् सांगितले. त्यांना पोलीस ठाण्यात घेवुन येवुन पोउनि / पन्हाड यांनी सदर इसम बालकाचे मामा व आई असल्याची योग्य पडताळणी करून रितसर त्या मुलाला त्यांच्या ताब्यात दिले.
सदर मुलास त्याची आई नुरजहों सय्यद व मामा नुरआलम नुरमोहम्मद सैयद यांचे ताब्यात सुखरूप दिले आहे. मुलाचे पालकांनी उल्हासनगर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
ही कारवाई उपायुक्त डॉ सुधाकर पठारे, अमोल कोळी, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, सी. एम. गोडसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पन्हाड, सपोउनि कडू, सपोउनि आहेर, अंमलदार सोनावळे, काळे, महिला हवालदार दौंड, महिला अंमलदार पाडवी, तडवी यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *