शारीरिक व मानसिक त्रास प्रताडना देवुन पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपी पतीस मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश यांसकडुन 10 वर्षे सश्रम कारावासाची व आर्थिक दंडाची शिक्षा…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :– ▶️ याबाबत थोडक्यात प्रकरण असे आहे की, घटनास्थळ – मौजा- भंगाराचौक गोरेगाव येथे घटना तारीख सन 2013 ते दिनांक- 06/06/2016 चे 17.30 वाजता दरम्यान यातील आरोपी – 1)लिखेंन्द्र धनलाल कटरे वय 31 वर्ष

2) धनवंताबाई बे. कटरे वय 66 वर्ष
3) ओमेश्वरी ज्ञानेश्वर पटले वय 32 वर्ष तिन्ही रा. भंगाराम चौक गोरेगाव
यांनी संगणमत करून फिर्यादीची मुलगी मृतक नामे- ज्योती कटरे, हिला माहेरून 50,000 हजार रुपयाचा हुंडा आणला नाही म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने व प्रताडना केल्याने त्या त्रासाला कंटाळून मृतक हिने दिनांक- 06/06/2016 चे 17.30 वा. दरम्यान हिरडामाली मार्ग रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या विहिरीत उडी घेऊन मरण पावल्याने व यातील आरोपी यांनी मृतक हिच्या छळ करून मरण्यास भाग पाडल्याने फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे.- गोरेगाव येथे अप. क्र.-39/2016 कलम – 304(ब), 498(अ), 34 भा.द.वि. अन्वये दिनांक 11/06/2016 चे 22.32 वा. गुन्हा दाखल करण्यात आले होते….

मा. वरिष्ठांचे निर्देश आदेशाप्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला……आरोपी विरुद्ध साक्ष पुरावे गोळा करून तपासाअंती आरोपी यांचे विरुद्ध गुन्ह्याचे दोषारोप तयार करून मा. न्यायालयात न्यायास्तव सादर करण्यात आले… मा. न्यायालयाचे केस क्र . : 97/2017 प्रमाणे खटला चालविण्यात आला……..सदर गुन्ह्यांत सबळ साक्ष पुरावे न्यायालयीन प्रक्रिया युक्तिवादा नंतर गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध दोष सिद्ध होत असल्याने..मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिश मा.वानखेडे, साहेब न्यायालय गोंदिया यांनी सदर प्रकरणाचा न्यायनिवाडा करून दिनांक 15/04/2024 रोजी खालील प्रमाणे आदेश पारित केले आहे..

▶️ निकाल – आरोपी क्र 1 ला कलम 304 “B” मधे 10 वर्ष कारावास व कलम 498 मधे 3 वर्ष कारावास व 2000 दंड व आरोपी क्र 2, 3 यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

▶️ सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी- सपोनि मनिष बन्सोड, पो.स्टे. गोरेगाव हे असून सदर गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज सरकारी वकील – श्री. खंडेलवाल यांनी केले … तर कोर्ट पैरवी म्हणून पो. हवा. प्रकाश शिरसे, यांनी कामकाज पाहिले…

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट