नवजात शिशुंची पैशांकरीता तस्करी करणा-या महीलांची टोळी वाकड पोलीस ठाणे तपास पथकाने केली जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार वंदु दत्ताञय गिरे यांना दिनांक १२/०४/२०२४ रोजी त्यांचे विश्वासु बातमीदारामार्फत खात्रीशीर मिळालेल्या बातमी मिळाली होती की, काही महीला या नवजात बालकाची विक्री (तस्करी) करणेकरीता जगताप डेअरी परीसरात, वाकड येथे येणार आहेत. सदरची बातमी वरिष्ठांना कळविली, सदरची घटना अत्यंत संवेदनशिल व गंभीर स्वरुपाची असल्याने त्याचे गांभीर्य ओळखुन श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी तात्काळ कारवाई करणेचे आदेशीत केले. त्याप्रमाणे श्री. बापु बांगर पोउपआयुक्त, परि-०२, डॉ. विशाल हिरे सहायक आयुक्त, वाकड विभाग पिंपरी चिंचवड यांनी कारवाईबाबत मार्गदर्शन केले.

वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी तपास पथकाचे अधिकारी, अंमलदार तसेच महीला अंमलदार यांना सापळा रचुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोउपनि. सचिन चव्हाण यांनी वरिष्ठांचे आदेशाने सोबतचे पोलीस अंमलदार व बातमीदार यांचे सोबत जगताप डेअरी परिसरात सापळा लावुन थांबले असता दि.१२/०४/२०१४ रोजी १६.१७ वा. दोन रिक्षा मधुन काही महीला आल्या त्यांचेबाबत संशय आलेने दोन्ही रिक्षामधील एकुण सहा महीलांना ताब्यात घेतले.

त्यांचेकडील नवजात बालकाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलेने त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणुन विश्वासात घेवुन चौकशी केली असता सहा महीलांनी मिळून त्यांचेतीलच एका महीलेचे सात दिवसांचे नवजात बालक ०५ लाख रुपयांना विक्री करणेकरीता आणलेची कबुली दिली.

सदरबाबत वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वंदु दत्ताञय गिरे यांचे फिर्यादीवरुन वाकड पो.स्टे.गु.रजि.नं. ४६३/२०२४ भादविक ३७० (३) (४) प्रमाणे दि. १२/०४/२०२४ रोजी गुन्हा दाखल करणेत आला असुन वरील सर्व महीलांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झालेने त्यांना अटक करुन रिमांडकामी हजर करणेत आले असता मा. न्यायालयाने त्यांची दि.१६/०४/२०२४ रोजी पर्यतची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे.

नमुद महीला या अतिशय सराईत असल्याने त्यांचेकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी यापूर्वी साथीदारांचे मदतीने अशाच प्रकारचे लाखो रुपयांचे रक्कमेकरीता पाच नवजात शिशुंची तस्करी केल्याचे कबुली दिली असुन त्याबाबत अधिक तपास चालु आहे.

सदरची उल्लेखनीय कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सारे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर सारे, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री.डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त साो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शना खाली वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे (गुन्हे), रविकिरण नाळे, पोउपनि. सचिन चव्हाण, पोउपनि, अनिरुध्द सावर्डे, श्रेणी पोउपनि. विभीषण कन्हेरकर, श्रेणी पोउपनि. बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदु गिरे, संदिप गवारी, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, दिपक साबळे, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबीले, रामचंद्र तळपे, विनायक घार्गे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, स्वप्निल लोखंडे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, महीला अंमलदार रेखा धोत्रे, जयश्री वाखारे, ज्योती तुपसुंदर, रोहीणी सोनसळे, प्रिया पवार यांनी केलेली असून पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे पोउपनि, सचिन चव्हाण हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट