राज्य उत्पादन शुल्क विभागाची तला तालुक्यातील ८ ढाब्यावर छापा एकूण एक लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त…
प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड :-रायगड :- लोकसभा निवडणूक 2024 च्या आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, विभागाकडून तला तालुक्यातील अवैधपणे दारूची विक्री व मद्य पिण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ढाब्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे यामध्ये सात ते आठ ढाब्यावर जाऊन कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तला तालुक्यातील चरई खुर्द आदिवासीवाडी, खांबवली धनगर वाडी, काटकोली धनगरवाडी, मालटेक पश्चिमे कडील भागात,श्री. रवीकिरण कोले राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. डी. वाय. वाडेकर दुय्यम निरीक्षक, श्री. आर. आर. कोळसे निरीक्षक, सौ. अपर्णा पोकळे सहा. निरीक्षक व जवान ए. एस. भगत यांनी घटनास्थळी जाऊन अवैध हातभट्टी निर्मिती केंद्र व हातभट्टी दारू विक्री केंद्र ढाब्यावर छापा टाकून कलम (65) ब. ई. एफ व कलम (65 ) ई नुसार गुन्हा दाखल केला आहे.




आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने तला तालुक्यातील हातभट्टी दारू निर्मितीच्या आठ ठिकाणावर दारूबंदी गुन्हाअंतर्गत छापे मारून गुन्ह्यांची नोंद करून 1 लाख 30 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 3 हजार लिटर तयार गावठी हातभट्टी दारू,एक लाख 5 हजार रुपये व 250 लिटर नवसागर रसायन मिश्रित गावठी दारू 25 हजार रुपये निर्मितीचे इत्तर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही अवैध दारू व्यवसायविरुद्ध अशाच प्रकारच्या मोहिमा आखून सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नमूद केले आहे.या कारवाईत (दुय्यम निरीक्षक) डी वाय वाडेकर, (सह. दुय्यम निरीक्षक )अपर्णा पोकळे,(जवान )ए.एस. भगत व (निरीक्षक )आर. आर. कोळसे हे पुढील तपास करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com