७ किलो गांजा व नशेच्या ७२० गोळ्या विक्री करणेकरीता आलेला आरोपी जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :– २,४३,०००/- रु. मुद्देमाल हस्तगत.
महात्मा गांधी पोलीस ठाणे
फिर्यादी नाव
गु.र.नं. १६/२०२४ एन.डी.पी.एस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) २ (क) २९ तसेच औषधे व सौदर्य प्रसाधने अधि. कलम १८ (सी) प्रमाणे
अनिल आण्णसो ऐनापुरे, नेम- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
गु.दा.ता वेळ ता. ११.०४.२०२४ रोजी २२.१५ वा.
माहिती कशी प्राप्त झाली पोशि / सुनिल जाधव पोशि / अभिजीत ठाणेकर पोहेकौं / कुबेर खोत
गु.घ.ता वेळ दि. ११.०४.२०२४ रोजी रात्री १७.०० वा चे दरम्यान
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था. गु. अ. शा, सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकों / कुबेर खोत, अरुण पाटील, सचिन धोत्रे, अमोल ऐदाळे, पोना / प्रकाश पाटील, पोशि / अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, रोहन घस्ते, विनायक सुतार, सुरज थोरात, अजय चेंद्रे, पोना / श्रीधर बागडी, कैप्टन गुंडवाडे, स्वप्निल नायकोडे, अजित पाटील सायबर पोलीस ठाणे.
अटक वेळ दिनांक
दि. ११/०४/२०२४ रोजी
आरोपीचे नांव पत्ता इम्रान उस्मान सनदे, वय ३० वर्षे, रा. विजयनगर, महाकाली कारखाना जवळ, कवठेमहांकाळ,
जप्त मुद्देमाल १. २,३६,०४०/- रु. किमतीचा काळपट हिरवट रंगाचा ७ किलो ८६८ ग्रॅम वजनाचा गांजा.
५,९६६/- रु. किंमतीची NRx Nitrazepam Tablets IP 10 mg NITRAVET – 10 एन कंपनीचे १५ गोळयाचे ४८ पाकिटे अशा एकूण ७२० गोळया.
३. १,०००/- रु. किमतीची स्कायबॅग्ज असे इग्रजीत लिहीलेली गडद चॉकलेटी रंगाची सॅक जु. बा. किं. अं.
२,४३,००६/- (दोन लाख त्रेचाळीस हजार सहा रुपये)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंद्याची तसेच अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने दि.११/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोशि / सुनिल जाधव, अभिजीत ठाणेकर आणि पोहेकों / कुबेर खोत यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, इम्रान सरदी रा. कवठेमहांकाळ हा मिरज रेल्वे स्टेशन जवळील कोल्हापुर ओव्हर ब्रिज खाली तयार गांजा माल व नशेच्या गोळया विक्री करीता घेवून येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, मिरज रेल्वे स्टेशन जवळील कोल्हापुर ओव्हर ब्रिज खाली सापळा लावून निगराणी करीत असताना, रेल्वे ब्रिज खाली पाठीला सँक अडकवलेला एक इसम थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव इम्रान उस्मान सनदे, वय ३० वर्षे, रा. विजयनगर, महाकाली कारखाना जवळ, कवठेमहांकाळ असे असलेचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास मिळाले बातमीची हकीकत सांगुन त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचर्चासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे पाठीवर अडकवलेल्या सेंकमध्ये गांजा माल व नायट्राव्हेट १० च्या गोळया मिळून आल्या. त्यास सदर गांजा माल व नायट्राव्हेट १० च्या गोळयाचाचत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सागितले की, सदरचा गांजा माल व नायट्राव्हेट १० च्या गोळया हया धारवाड राज्य कर्नाटक येथून जावेद (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) याचेकडून याचेकडुन खरेदी करून तो जादा दराने विक्री करणेकरीता घेवून आला असल्याची कबूली दिली.
लागलीच सदर आरोपी व गांजा माल सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचा समक्ष जप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेस याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com